महाराष्ट्र राज्य नप कर्मचाऱ्यांचे अंदोलन संपन्न

विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे आमदारांचे आश्वासन

माहुर (एनएनएल) महाराष्ट्र राज्य नप कर्मचाऱ्यांचे सामुहिक रजा अंदोलन आज दि.09 (बुधवार) रोजी नगर पंचायत कार्यालय माहुर येथे संपन्न झाले.

सातवा वेतन आयोग,सहाय्य अनुदान रद्द करने,नप कर्मचाऱ्यांना आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मिळावे,रोजनदारी कर्मचाऱ्यांना विना अट कायम करणे,नपचे बळकटिकरण, मुख्याधिकारी यांना उन्नत दर्जा,बदली धोरणातील जाचक अटी,अदीसह तिस ते चाळीस मांगण्या प्रलंबित आहे त्या साठी बुधवार रोजी सामुहिक अंदोलन करण्यात आले.या विषयी आमदार प्रदिप नाईक यांना भ्रमणध्वनीवरून कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्या नंतर त्यांनी या विषयी चालु अधिवेशनात शुन्य प्रहरात प्रश्न उपस्थित करण्याचे अश्वासन दिले.तर नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी अदोलना ला पांठिबा देत नगराध्यक्ष संघटना कर्मचाऱ्यां सोबत तण मण धणाने सोबत असल्याचा अभिप्राय दिल.प्रस्ताविकातुन स्थानिक  कर्मचारी संघटनेचे नेते शेषेराव भिसे यांनी गेल्या अनेक वर्षा पासुन नप अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मागण्यांना वाटण्याचा अक्षदा लावण्यात येत आहे.त्या मुळे अंदलोनाची दिशा ठरविण्यात आली असुन दि.10 ते 14 आगष्ट  पर्यंत काळ्या फिती लाउन काम व त्या नंतर 15 आगष्ट रोजी ध्वजारोहन नंतर आमदार खासदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.त्या नंतर ही मागण्या मान्य न झाल्यास 21 आगष्ट पासुन नाईलाजास्तव काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगीतले आहे. नगर पंचायत कर्मचाऱ्यांचा आंदोलनास पाठींबा देण्यासाठी नगराध्यक्ष मा. फिरोज दोसानी, मा. राजकुमार भोपी साहेब, माजी नगराध्यक्ष मा. राजेंद्र केशवे, नगरसेवक रहेमतअलीसाब, रफीकभाई सौदागर, इलियास बाबानी, प्रा. जोगदंड सर,आनंद भाऊ तुपदाळे,अजीस भाई व कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांची उपस्थिती होती.तर सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित अंदोलन 100 % यशस्वी झाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी