सामाजिक न्यायमंत्री ना.बडोले यांच्याशी मंगेश कदम यांची सामाजिक प्रश्नांवर चर्चा

नांदेड (एनएनएल) राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.राजकुमार बडोले यांच्यासोबत सामाजिक प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्ते मंगेश कदम यांची दीड तास चर्चा झाली आहे.

मुंबई येथील `सातपुडा' निवासस्थानी ना. बडोले यांची कदम यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान समाजातील दलित, आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या, आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविध अपुऱ्या आहेत. विद्यार्थींनीच्या महिला वार्डनची
नियुक्ती करा तर सामाजिक न्यायविभागाकडून चालविण्यात येणाऱ्या बौध्द मुला-मुली विद्यार्थ्यांना सुविधा आणि सुरक्षिततेचे मुद्देही या चर्चेत मांडले. विशेषत: महागाई निर्देश अंकामुल्यानुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. यासाठी ना. बडोले यांचे लक्ष वेधले. मागासवर्गीय आदिवासी, दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना  किमान 5 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात यावी, असा प्रश्नही कदम यांनी उपस्थित केला. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी प्रत्येक तालुक्यावर समाजकल्याण विभागाची निर्मिती करून समाजाच्या विकासासाठी विविध योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही कदम यांनी चर्चेद्वारे मुदा उपस्थित केला. तब्बल दीड तास समाजाच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.  यावेळी ना. बडोेले यांच्या सौभाग्यवती शारदा बडोले यांची यावेळी उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी