न्यायालयात 7 लाख रुपये न भरणाऱ्या एकाचा ट्रक जप्त केला बेलिफानी

नांदेड (एनएनएल) एक मोटार अपघात प्रकरणात मोटर मालकांविरुद्ध ७ लाख रुपये तक्रारदार महिलेला देण्याचे आदेश सन 2008 पूर्वीच झालेले असतांना आज त्या ट्रक मालकाचा एक ट्रक न्यायालयाच्या बेलिफाने पोलिसांच्या मदतीने पकडून आणल्याने आपल्या घरातील कर्ता पुरुष गमावणाऱ्या महिलेला काहीतरी आर्थिक मदत मिळणार असे चित्र दिसते आहे.

मोटार अपघात प्रकरण क्रमांक 39/2005 मध्ये विमलबाई या महिलेने आपल्या घरातील कर्ता पुरुष एका अपघातात मरण पावल्याने मोटर वाहन कायद्यातील तरतूनीनुसार खटला दाखल केला.त्या खटल्यात अपघात करणाऱ्या वाहनाचा
विमा नसल्याने त्या प्रकरणातील मोटर वाहन मालक रेखासिंघ संधू विरुद्ध न्यायालयाने तक्रारदार महिला विमलबाई यांना 7 लाख रुपये देणायचे आदेश पारित केले.आज तारखे पर्यंत या 7 लाखांचे व्याज जोडून 14 लाख रुपये झाले असतील असे न्यायालय परिसरात लोक बोल्ट होते.प्रत्यक्षात त्या तक्रारदार महिलेच्या हातात किती रक्कम मिळणार हे कोडे असते असेही काही जण सांगत होते.

आदेश झाल्यानंतर सुद्धा रेखासिंघ संधू याने 7 लाख रुपये भरले नाहीत म्हणून त्या विरुद्ध आर डी दाखल झाली तरीही 7 लाखांची रक्कम न भरणाऱ्या रेखासिंघ संधू विरुद्ध मालमत्ता जप्तीचे आदेश निघाले.न्यायालयातील या प्रक्रियेसाठी बेलीफ काम करतात.आज बेलीफ शंकर कोतवाल यांनी विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक आर.बी.गोबाडे यांच्या संरक्षण आणि मदतीने  नांदेड हैद्राबाद वळण रस्त्यावरील संधू ट्रान्सपोर्ट येथून रेखासिंघ संधू  यांच्या मालकीचा दहा टायर असलेला ट्रक क्रमांक एम.एच.26 एच - 5659 आणून न्यायालयाच्या प्रांगणात उभा केला आहे.त्यामुळे आता तक्रारदार महिला विमलबाईला काही तरी आर्थिक मदत मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.ट्रक जप्त करून न्यायालयाच्या परिसरात उभा करण्याची हि बहुधा पहिलीच वेळ असावी असे सांगण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी