राजकीय बदलाचे ढग अन् प्रतापरावांच्‍या नावाची हवा

लोहा (हरिहर धुतमल) राजकीय बदलाचे ढग जिल्‍ह्याच्‍या राजकारणात जमा होत असतानाच लोहा – कंधारच्‍या काही भागात ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट सुरू आहे. कोरड्या ढगातून पाणी पडते काय याची चाचणी सुरू आहे तर दुसरीकडे सागरावर वादळ उठविण्‍याचा जाणीवपूर्व प्रयत्‍न केला जातोय. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आज लोह्याच्‍या मार्केट कमेटी परिसरातप्रमुख कार्यकर्त्‍यानी फुलून गेलेहोते निमित होते आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या वाढदिवसाचे.


जिल्‍ह्याच्‍या राजकारणात कॉंग्रेस प्रदेशाध्‍यक्ष खा. अशोकराव चव्‍हाण आ. प्रतापराव पाटील यांचे राजकारण केंद्रस्‍थानी असते. जिल्‍ह्याच्‍या राजकीय क्षेत्रात सद्या आ. प्रतापराव पाटील यांच्‍याजय महाराष्‍ट्र ते जय श्री राम या प्रवासाची सगळीकडेचे जोरदार चर्चा झडते आहे. राजकीय बदलाचे ढग जिल्‍हाभर व्‍यापतअसतानाच कंधारच्‍या भागात अधून मधून हलकी बुंदाबांदी होते आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होतो आहे. दक्षिण भागात आभाळ आलाय बहाद्दर पु-यात गर्जना सुरू झाली असा सागर वर्षा सुरू आहे.

याच पार्श्‍वभूमीवर लोह्याच्‍या बाजार समितीत आ. प्रतापराव पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्‍यांशी मुक्‍त संवाद साधला पण कोणतेच राजकीय भाष्‍य केले नाही. बाबुराव केंद्र, प्रवीण पाटील चिखलीकर, माणिकराव मुकदम, बालाजी पाटील मारतळेकर, किरण वट्टमवार, शरद पवार,सतीश पाटील उमरेकर, बालाजी पाटील कदम, केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल, सचिन पाटील चिखलीकर, गणेशराव सावळे, नरेंद्र गायकवाड, रोहित पाटील, साहेबराव काळे, बालाजी पाटील बोरगावकर, बाबाराव पाटील गवते, जफरोद्दीन शेख,यासह लोहा कंधार मधील प्रमुख कार्यकर्त्‍यानी परिसर फुलला होता. भाजपा पक्ष प्रवेशासंदर्भात बैठकीत चर्चा झाली नाही.वाढदिवसा विषयी कार्यकर्त्‍यांशी मनमोकळेपणांनी गप्‍पागोष्‍टी झाल्‍या.प्रतापरावांच्‍या मनात नेमकं काय चाललंय ? याचा थांगपता लागला नाही बदलाच्‍या चर्चावर त्‍यांनी ना भाष्‍य केले नाही खुलासा त्‍यामुळे काही जणांची अस्‍वस्‍थता वाढली बदलाचे ढग बरसात करतात की हा मोसम जाऊ देतात ? याकडे सर्व जिल्‍ह्याचे लक्ष लागले आहे. सद्या हवामान खात्‍याचा अंदाज खरा ठरत नाही(?)त्यामुळे सागरात लाटा उसळल्या तरी त्यांची सध्याच्या काळात पूर्वी प्रमाणे (२००९) सुनामी येणार नाही . भरती ओहोटी तर येत राहील असे  राजकीय विश्लेषकांच्या गोटात विश्वास व्यक्त केला जात आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी