NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

बुधवार, 17 जून 2015

दमदार पावसाने

सहस्रकुंड धबधबा खळखळू लागलाहिमायतनगर(उत्कर्ष मादसवार)नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील हिमायतनगर पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सुप्रसिद्ध सहस्रकुंड बाणगंगा धबधबा खळखळ वाहू लागला आहे. 

मृग नक्षत्रात झालेल्या दमदार पावसाने आणि कयाधू नदी दुथडी भरून वाहू लागल्याने विदर्भ - मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा खळखळ वाहू लागला आहे. रामायण कालीन अख्याईका असलेल्या या नैसर्गिक धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले या दिशेने वळत आहेत. मागील चार वर्षा नंतर पहिल्यांदाच जून महिन्यात सहस्रकुंड धबधबा वाहत आहे. १०० ते १५० फुटावरून पडणारा धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या विहंगम दृश्याचा आनंद पर्यटक ८० फुट उंचीच्या मनोर्यावरून घेत आहे. तर संपूर्ण परिसर देखील हिरवाईने नटला असून, या धबधब्याच्या काठावर पुरातन कालीन महादेव मंदिर आहे. या ठिकाणी श्रावण मास, दर सोमवारी दर्शनसाठी भक्त येतात. मात्र अद्याप या ठिकाणी पोलिस अथवा मंदिर प्रशासनाने सुरक्ष गार्ड तैनात केला नसल्याने दुर्घटनेची शक्यता बळावली आहे.

शनिवार, 13 जून 2015

बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानात गर्दी

कालच्या पावसाने पेरणीची लगबग... 
बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानात गर्दी


हिमायतनगर(वार्ताहर)शक्रवारी मध्यरात्री तालुकाभरात झालेल्या कमी - अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात उत्साह संचारला आहे. पेरणीसाठी लागणारे खते - बियाणे खरेदीसाठी शनिवारी बाजारात शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. काही भागातील शेतकर्यांनी कापूस लागवडीने पहिल्या टप्यातील पेरणीची लगबग सुरु केल्याचे चित्र दिसून येत आहे.

मृग नक्षत्र लागतच आभाळात झालेल्या ढगाळ वातावरणाने काही शेतकर्यांनी कोरड्या जमिनीत  पहील्या टप्याची पेरणी केली होती. मृग नक्षात तुरळक प्रमाणात झालेल्या पावसावर तालुका परीसरातील जवळपास ३० टक्के शेतक-यांनी कापुस, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांची पहील्या टप्याची पेरणी कोरड्या जमिनीत केली होती. परंतु तुरळक प्रमाणात पाऊस पडून उघडल्याने शेतक-यांच्या कपाशीची बियाणे मध्येच कुजुन जाण्याची भीती व्यक्त होत होती. दरम्यान दि.११ आणि दि.१२ शुक्रवारी मध्यरात्री सुरु झालेल्या दमदार पावसामुळे त्या सरसम, हिमायतनगर, जवळगाव परीसरातील शेतीच्या रानात पाणीच पाणी झाले असुन, बळीराजा सुखावला आहे. 

गतवर्षी कापुस उत्पादक शेतक-यांना निसर्गाच्या लहरीपनाचा मेाठा फटका बसला होता. सरासरी पेक्षा कमी झालेले उत्पन्न त्यातच भावात झालेली घसरण यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. त्या संकटावर मात करुन खरीप हंगामेच स्वागत करीत नव्या जोमाने शेतकरी कामाला लागला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या पे-याचा आकडा कमी होण्याची शक्यता बळावली असुन, सोयाबीन पिकांवर भर देऊऩ गोर- गरीब अल्पभुधारक शेतक-यांनी शनिवारच्या मुहूर्तावर पेरणीला सुरुवात केली असल्याचे चित्र तालुका परिसरात दिसून आले आहे. 

आतापर्यंत केवळ ६६.६६ मी.मी.पावसाची नोंद 
------------------------------------ 
मृग नक्षत्रानंतर पाचव्या दिवशी पावसाला सुरुवात झाली असून, गुरुवारी रात्रीला हिमायतनगर १२ मी.मी., जवळगाव २७ मी.मी., सरसम ३० मी.मी. तर शुक्रवारच्या रात्री १० वाजेच्या दरम्यान अल्प पावसाने सुरुवात करून मध्यरात्री उशिरा दमदार पावसाचा जोर वाढल्याने हिमायतनगर ३० मी.मी., जवळगाव ३३ मी.मी., सरसम ५५ मी.मी. अशी सरसरी ३९. ३३ मी.मी. नोंद करण्यात आली असून, यावर्षी आत्तापर्यंत एकूण ६६.६६ मी.मी. आणि ६. ८२ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती नायब तहसीलदार श्री एस.एम.देवराये यांनी दिली. 

घाण पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात 
-------------------------
पावसाळ्यापूर्वी ग्राम पंचायतीने नाल्याची सफाई केली नसल्याने कालच्या पावसाने शहरातील अनेक प्रभागात पाणीच पाणी साचले असून, पावसामुळे नालीतील घाण रस्त्यावर आल्याने शहरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना कराव लागत आहे. परिणामी दासांची उत्पत्ती वाढून नागरिकांचे आरोग्यद धोक्यात येण्याची शक्य बळावली आहे. तातडीने नाल्याची सफाई करून नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

पेरणीची गरबड करू नये - कृषी अधिक्षक 
--------------------------------
हिमायतनगर तालुक्यात ०१ जूनपासून आतापर्यत सरासरी ६६.६६ मि.मी.पाऊस झाला आहे. शेतकर्यांनी आत्ताच पेरणीची गरबड न करता किमान १०० मि.मि. पाऊस झाल्याशिवाय पेरण्या प्रारंभ करु नये असे आवाहन कृषी अधिक्षकांनी नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून शेतकर्यांना केले आहे.

अश्विन राउत या विद्यार्थ्याने ९५ टक्के गुण

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविले ९५ टक्के गुणहिमायतनगर(बी.आर.पवार)तालुक्यातील मौजे सवना ज.येथील एका गरीब शेतमजुराच्या मुलाने कोणतीही खाजगी शिकवणी न लावता इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून गगनभरारी घेत तालुक्यातून दुसरा येण्याचा मान मिळविला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. 

शहरातील राजा भगीरथ शाळेत इयत्ता दहावीचे शिक्षण घेवून नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र माध्यमिक परीक्षेत सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकाल दि.०९ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून, यात हिमायतनगर तालुक्यातील सवना ज. येथील अश्विन भीमराव राउत या विद्यार्थ्याने ९५ टक्के गुण प्राप्त केले. सदर विद्यार्थ्याचे वडील हे शेतमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असून, त्यांनी मुलाला उच्च शिक्षण देण्याचे प्रयत्न केला आहे. त्यांच्या सोबत कुटुंबाच्या कामात हातभार लावत अश्विन याने प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांच्या शिका, संघटीत व्हा या उक्तीचे अनुकरण करीत मिळेल त्या वेळेत अभ्यास केला. कोणताही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता केवळ शालेय अभ्यासिकात शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनावर त्याने यश संपादित केले आहे. त्याने सर्वात कठीण समजल्या जाणार्या गणित या विषयात ९९ गुण संपादित केले आहे. दृढ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही समस्या यशाच्या मार्गातील अडसर होऊ शकत नाही हे त्यांनी सिद्ध केले असून, आपल्या यशाचे श्रेय त्यांनी गुरुजन वर्ग आई - वडिलांना दिले आहे. गरीब कुटुंबात राहून आभाळाला गवसणी घालण्याजोगे त्याने मिळविलेल्या यशाबद्दल तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, कार्याध्यक्ष प्रकाश जैन, सचिव अनिल मादसवार, संघटक कानबा पोपलवार, अनिल भोरे, असद मौलाना, वसंत राठोड, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आदीसह सर्व स्तरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

अशोकरावांची साथ सोडणार नाही

शेवटपर्यंत अशोकरावांची साथ सोडणार नाही...जवळगावकरहिमायतनगर(वार्ताहर)कॉंग्रेस पक्षाने मला भरभरून दिले असून, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाणांची शेवटपर्यंत साथ सोडणार नसल्याचे माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेड न्युज लाईव्हशी बोलताना सांगितले. 

ते हिमायतनगर शहरात लग्न समारंभासाठी आले असता पत्रकारंशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, हल्ली माध्यमामधून माझ्या विषयी अनेक वावड्या उठविल्या जात असून, काही जन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझे वडील स्व.कै.निवृत्ती पाटील यांच्या काळापासून ते आजपर्यंत कॉंग्रेस पक्षाचे कार्य माझ्या घराणे निष्ठेने केले असून, स्व.शंकरराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी यापूर्वीही कॉंग्रेस पक्षाचे कार्य निष्ठेने केले आहे, करत आहे आणि भविष्यात शेवटपर्यंत अशोकरावाची साथ कदापि सोडणार नसल्याचे स्पष्ठ प्रतिपादन पत्रकारांशी बोलताना करून, वर्तमान पत्रातून उठणाऱ्या पक्षांतराच्या वावड्यांना पूर्णविराम दिला आहे. 

हदगाव - हिमायतनगर मतदार संघात २०१० ते २०१५ या पंचवार्षिक काळात रेकोर्ड ब्रेक विकास कामे करणाऱ्या जवळ गावकर यांच्या अल्पश्या मताने २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी पराभवाने खचून न जात त्यांच्या कामाचा जोश व त्यांच्या मनमिळावू स्वभावाने आजही कार्यकर्त्यांचे थवे त्यांच्या भोवती गराडा घालताना दिसत आहेत.

नुकसान होण्याची शक्यता

अर्धवट निकृष्ठ बंधार्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता 

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मंगरूळ - खैरगाव तांडा येथील नाल्यावर अर्धवट व निकृष्ठ पद्धतीने बांधण्यात आलेल्या बंधार्यामुळे नजीकच्या शेतकऱ्यांचे पावसाच्या पाण्याने नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. तर जोरदार पावसाच्या पुराने बंधारा वाहून जाण्याची चिंता शेतकर्यांना वाटू लागली आहे. 

जलसंधारण विभागामार्फत नांदेड - किनवट रस्त्यावरील खैरगाव तांडा नजीक असलेल्या अर्जुन लालसिंग राठोड यांच्या शेताजवळून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यावर या उन्हाळ्यात नांदेड येथील एका गुत्तेदरामार्फत तीन बंधारे बांधण्यात आले. या तीन बंधार्यासाठी अंदाजित ३० लाखाची निधी मंजूर झाला होता. शेतकर्यांना सदरील बंधार्याचा सिंचनासाठी उपयोग व्हावा हा उद्दात हेतू असतानाही संबंधित गुत्तेदार व अभियंत्याच्या अभद्र युतीने मूळ उद्देशाला केराची टोपली दाखवीत शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे काम संबंधितानी केले आहे. या महाभागाने संगनमताने बंधाऱ्याच्या कामात टोळक्या दगडाचा वापर करून अल्प सिमेंट वापरून अत्यंत निकृष्ठ पद्धतीने बांधकाम केले आहे. आजघडीला येथील तिन्ही बंधारे लिकेज होत असल्याने नाल्यातील पाणी अडवून न राहता वाहून जात आहे. यामुळे सदर बंधारा पावसाळ्यातील मोठ्या पावसाने वाहून जाण्याची शक्यता परिसरातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर बंधाऱ्याच्या बाजूच्या काठाची २०० मीटर दगडाने पिचिंग करण्याचे असताना दोन - तीन मीटर दगडे रचून बांधकाम अर्धवट ठेवून बिले उचलण्याचा खटाटोप केला आहे. तसेच नाल्याच्या बाजूने पाण्याच्या प्रवाहाने निर्माण झालेले पौळ बुजून वाहणारे पाणी हे नाल्यात साचून राहावे यासाठी गुत्तेदाराने प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र पैश्याने हपापलेल्या संबंधित गुत्तेदार व अभियंत्याने सर्व नियम धाब्यावर ठेवून थातूर- माथुर बांधकाम करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. या प्रकारामुळे पुराचे पाणी नाल्याच्या बाहेरून बाजूच्या शेतात घुसून जमीन खचण्याची व पिके वाहून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

या बांधकामाची संबंधित वरिष्ठांनी चौकशी करून निकृष्ठ काम करणाऱ्या गुत्तेदार व त्याची देखरेख करणाऱ्या अभियंत्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. आणि अर्धवट ठेवलेले पिचिंगचे काम पूर्ण करून नाल्याच्या बाजूचा पौळ बुजवून शेतीचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.  

काम पूर्ण करून नुकसान टाळावे - शेतकरी अर्जुन राठोड 
--------------------------
मागील काळात नाल्याच्या बाजूचा पौळ फुटून पाणी शेतात आल्याने पिके नुकसानीत आली. बंधारा बांधताना सांगूनही गुत्तेदाराने चुकीचे काम केले. त्यामुळे पिचिंगचे काम अजूनही अर्धवट ठेवल्याने  शेतात पाणी घुसून पिके गालात रुततील. गेल्या वर्षी तर काहीच पिकले नाही यावर्षी सुद्धा छटाक भर कापूस हाती येईल कि नाही..? याची चिंता आहे. या कामाची चौकशी करून अर्धवट काम पूर्ण करून होणारे संभाव्य नुकसान टाळावे असेही मागणी शेतकरी अर्जुन राठोड यांनी केली.  

मंगलवार, 2 जून 2015

मशागत

पावसाळा तोंडावर... शेतकरी मशागतीत मग्नहिमायतनगर(अनिल मादसवार)मृग नक्षत्र सहा दिवसावर एवुन ठेपल्याने बळीराजा अंग झटकून शेती कामाला लागला असून, दरम्यान उन्हाची तीव्रता अधिकच वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने मशागतीची कामे करताना नाके नऊ येत आहेत. 

गात वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यावर्षी शेतकर्‍यांना रबी हंगाम घेता आला नाही. एवढेच नव्हे तर वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक नैसर्गिक संकटाने शेतकर्यांना अडचणीत आणेल आहे. त्यावर मात करत मोठय़ा हिमतीने खरीप हंगाम घेण्यासाठी बळीराजा पेरणी पूर्व मशागतीच्या कामात गुंतला आहे. सध्या स्थितीत शेतात नांगरटी, वखरटी, पंजी, कचरा वेचणी आदीसह पावसाचे पाणी जमितीच झिरपावे यासाठी कृषी विभागाच्या ढाळीचे बांध टाकण्याच्या कामांना वेग आला आहे. हि कामे सुरु असताना उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असल्याने शेतकरी पहाटेच्या प्रहरी कामात गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे. दुपारी ११ नंतर उन वाढत असल्याने कामे बांध करून विश्रांती घ्यावी लागत आहे. उन्हाची तीव्रता कमी होताच पुन्हा सायंकाळी ५ नंतर कामाला सुरुवात करून अंधार होईपर्यंत कामात गुंतल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. 

रोहिणी नक्षत्र लागून जवळपास सहा दिवस लोटले असताना अद्याप रोहिण्या बरसल्या नाही. काही ठिकाणी त्यासुद्धा तुरळक प्रमाणात बरसल्याने रोहीण्याचे आगमन होईल कि नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हवामान खाते वेळेवर पाऊस सुरु होणार असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकर्यांना आगामी खरीप हंगाम बाबतची चिंता आत्तापासून सतावत आहे. त्यामुळे यावर्षी मोठा पाऊस होईपर्यंत पेरणीच्या कामाला लागणार नाही असे अनेक शेतकरी उघडपणे बोलून दाखवीत आहेत.

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com