अश्विन राउत या विद्यार्थ्याने ९५ टक्के गुण

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविले ९५ टक्के गुण



हिमायतनगर(बी.आर.पवार)तालुक्यातील मौजे सवना ज.येथील एका गरीब शेतमजुराच्या मुलाने कोणतीही खाजगी शिकवणी न लावता इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून गगनभरारी घेत तालुक्यातून दुसरा येण्याचा मान मिळविला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. 

शहरातील राजा भगीरथ शाळेत इयत्ता दहावीचे शिक्षण घेवून नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र माध्यमिक परीक्षेत सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकाल दि.०९ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून, यात हिमायतनगर तालुक्यातील सवना ज. येथील अश्विन भीमराव राउत या विद्यार्थ्याने ९५ टक्के गुण प्राप्त केले. सदर विद्यार्थ्याचे वडील हे शेतमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असून, त्यांनी मुलाला उच्च शिक्षण देण्याचे प्रयत्न केला आहे. त्यांच्या सोबत कुटुंबाच्या कामात हातभार लावत अश्विन याने प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांच्या शिका, संघटीत व्हा या उक्तीचे अनुकरण करीत मिळेल त्या वेळेत अभ्यास केला. कोणताही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता केवळ शालेय अभ्यासिकात शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनावर त्याने यश संपादित केले आहे. त्याने सर्वात कठीण समजल्या जाणार्या गणित या विषयात ९९ गुण संपादित केले आहे. दृढ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही समस्या यशाच्या मार्गातील अडसर होऊ शकत नाही हे त्यांनी सिद्ध केले असून, आपल्या यशाचे श्रेय त्यांनी गुरुजन वर्ग आई - वडिलांना दिले आहे. गरीब कुटुंबात राहून आभाळाला गवसणी घालण्याजोगे त्याने मिळविलेल्या यशाबद्दल तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, कार्याध्यक्ष प्रकाश जैन, सचिव अनिल मादसवार, संघटक कानबा पोपलवार, अनिल भोरे, असद मौलाना, वसंत राठोड, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आदीसह सर्व स्तरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी