बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानात गर्दी

कालच्या पावसाने पेरणीची लगबग... 
बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानात गर्दी


हिमायतनगर(वार्ताहर)शक्रवारी मध्यरात्री तालुकाभरात झालेल्या कमी - अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात उत्साह संचारला आहे. पेरणीसाठी लागणारे खते - बियाणे खरेदीसाठी शनिवारी बाजारात शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. काही भागातील शेतकर्यांनी कापूस लागवडीने पहिल्या टप्यातील पेरणीची लगबग सुरु केल्याचे चित्र दिसून येत आहे.

मृग नक्षत्र लागतच आभाळात झालेल्या ढगाळ वातावरणाने काही शेतकर्यांनी कोरड्या जमिनीत  पहील्या टप्याची पेरणी केली होती. मृग नक्षात तुरळक प्रमाणात झालेल्या पावसावर तालुका परीसरातील जवळपास ३० टक्के शेतक-यांनी कापुस, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांची पहील्या टप्याची पेरणी कोरड्या जमिनीत केली होती. परंतु तुरळक प्रमाणात पाऊस पडून उघडल्याने शेतक-यांच्या कपाशीची बियाणे मध्येच कुजुन जाण्याची भीती व्यक्त होत होती. दरम्यान दि.११ आणि दि.१२ शुक्रवारी मध्यरात्री सुरु झालेल्या दमदार पावसामुळे त्या सरसम, हिमायतनगर, जवळगाव परीसरातील शेतीच्या रानात पाणीच पाणी झाले असुन, बळीराजा सुखावला आहे. 

गतवर्षी कापुस उत्पादक शेतक-यांना निसर्गाच्या लहरीपनाचा मेाठा फटका बसला होता. सरासरी पेक्षा कमी झालेले उत्पन्न त्यातच भावात झालेली घसरण यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. त्या संकटावर मात करुन खरीप हंगामेच स्वागत करीत नव्या जोमाने शेतकरी कामाला लागला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या पे-याचा आकडा कमी होण्याची शक्यता बळावली असुन, सोयाबीन पिकांवर भर देऊऩ गोर- गरीब अल्पभुधारक शेतक-यांनी शनिवारच्या मुहूर्तावर पेरणीला सुरुवात केली असल्याचे चित्र तालुका परिसरात दिसून आले आहे. 

आतापर्यंत केवळ ६६.६६ मी.मी.पावसाची नोंद 
------------------------------------ 
मृग नक्षत्रानंतर पाचव्या दिवशी पावसाला सुरुवात झाली असून, गुरुवारी रात्रीला हिमायतनगर १२ मी.मी., जवळगाव २७ मी.मी., सरसम ३० मी.मी. तर शुक्रवारच्या रात्री १० वाजेच्या दरम्यान अल्प पावसाने सुरुवात करून मध्यरात्री उशिरा दमदार पावसाचा जोर वाढल्याने हिमायतनगर ३० मी.मी., जवळगाव ३३ मी.मी., सरसम ५५ मी.मी. अशी सरसरी ३९. ३३ मी.मी. नोंद करण्यात आली असून, यावर्षी आत्तापर्यंत एकूण ६६.६६ मी.मी. आणि ६. ८२ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती नायब तहसीलदार श्री एस.एम.देवराये यांनी दिली. 

घाण पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात 
-------------------------
पावसाळ्यापूर्वी ग्राम पंचायतीने नाल्याची सफाई केली नसल्याने कालच्या पावसाने शहरातील अनेक प्रभागात पाणीच पाणी साचले असून, पावसामुळे नालीतील घाण रस्त्यावर आल्याने शहरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना कराव लागत आहे. परिणामी दासांची उत्पत्ती वाढून नागरिकांचे आरोग्यद धोक्यात येण्याची शक्य बळावली आहे. तातडीने नाल्याची सफाई करून नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

पेरणीची गरबड करू नये - कृषी अधिक्षक 
--------------------------------
हिमायतनगर तालुक्यात ०१ जूनपासून आतापर्यत सरासरी ६६.६६ मि.मी.पाऊस झाला आहे. शेतकर्यांनी आत्ताच पेरणीची गरबड न करता किमान १०० मि.मि. पाऊस झाल्याशिवाय पेरण्या प्रारंभ करु नये असे आवाहन कृषी अधिक्षकांनी नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून शेतकर्यांना केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी