शेवटपर्यंत अशोकरावांची साथ सोडणार नाही...जवळगावकर
हिमायतनगर(वार्ताहर)कॉंग्रेस पक्षाने मला भरभरून दिले असून, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाणांची शेवटपर्यंत साथ सोडणार नसल्याचे माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेड न्युज लाईव्हशी बोलताना सांगितले.
ते हिमायतनगर शहरात लग्न समारंभासाठी आले असता पत्रकारंशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, हल्ली माध्यमामधून माझ्या विषयी अनेक वावड्या उठविल्या जात असून, काही जन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझे वडील स्व.कै.निवृत्ती पाटील यांच्या काळापासून ते आजपर्यंत कॉंग्रेस पक्षाचे कार्य माझ्या घराणे निष्ठेने केले असून, स्व.शंकरराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी यापूर्वीही कॉंग्रेस पक्षाचे कार्य निष्ठेने केले आहे, करत आहे आणि भविष्यात शेवटपर्यंत अशोकरावाची साथ कदापि सोडणार नसल्याचे स्पष्ठ प्रतिपादन पत्रकारांशी बोलताना करून, वर्तमान पत्रातून उठणाऱ्या पक्षांतराच्या वावड्यांना पूर्णविराम दिला आहे.
हदगाव - हिमायतनगर मतदार संघात २०१० ते २०१५ या पंचवार्षिक काळात रेकोर्ड ब्रेक विकास कामे करणाऱ्या जवळ गावकर यांच्या अल्पश्या मताने २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी पराभवाने खचून न जात त्यांच्या कामाचा जोश व त्यांच्या मनमिळावू स्वभावाने आजही कार्यकर्त्यांचे थवे त्यांच्या भोवती गराडा घालताना दिसत आहेत.