जैविक विविधता दिन साजरा

गोदावरी नदी काठाच्या सफाईने जैविक विविधता दिन साजरा 

नांदेड(प्रतिनिधी)जागतिक जैविक विविधता दिनानिमित्त वनविभाग, नांदेड नैचुरल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २२ रोजी सकाळी ६ ते ९ यावेळेत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी गुरुद्वारा जावालीन नदीकाठावर येउन गोदापात्रातील घन व निर्माल्या कचरा काढून सफाई करण्यात येउन जैव विविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यात आले. याप्रसंगी स्वतः जिल्हाधिकारी धीरजकुमार, वनविभागाचे सुजय डोडल , नांदेड वाघाळा मनपाचे अरुंधती पुरंदरे, नैचुरल क्लबचे मेंबर यांच्यासह शेकडो नागरिक या कामात सहभागी झाले होते.

संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी २२ मे हा आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी अधिसूचना जारी केलेलि आहे. त्यानुसार जैविक विविधता व पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन जागतिक जैविक विविधता दिनी संगोपन व संवर्धन व्हावे यासाठी हि संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यातून समाजात एक व्यापक जनजागृती निर्माण व्हावी म्हणून म्हणून नांदेड शहरातून वाहणारी गोदावरी नदीच्या बेटावर जमलेली जैविक घाण साफ करून हि चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले. गुरुवार दि.२२ सकाळी ६ वाजल्यापासून नदीच्या काठावर जिल्हाधिकारी धीरजकुमार, वनविभागाचे सुजय डोडल, नांदेड वाघाळा मनपाचे अरुंधती पुरंदरे, नैचुरल क्लबचे मेंबर, गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य, नागरिक, पोलिस कर्मचार्यांनी उपस्थिती दर्शून या सफाई मोहिमेत सहभाग घेतला होता. 

भारतीय राज्यघटनेनुसार वने, तलाव, नद्या आणि वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि सर्व सजीवाविषयी अनुकंपा बाळगणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, यासाठी  सर्वांनी आपापल्या परिसरातील बेटावर जाऊन हा दिन साजरा करून आपले कर्तव्य पार पडावे असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. दरम्यान नदीच्या काठावर जमलेली सर्व घाण व निमाल्या सफाई करून पर्यावरणाचे संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्यात आली आहे. हि मोहीम दर महिन्याला राबवावी तसेच नदी पत्रात मिसळणाऱ्या घाण पाण्याची दिशा बदलून वाहणाऱ्या पाण्याचे पावित्र राखण्याकडे नगर पालिकेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत अनेकानी व्यक्त केले.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी