सोळावं ठरलं वानखेडेना धोक्याच

हिमायतनगर(वार्ताहर)काल घोषित झालेल्या लोकसभेच्या निकालाने नांदेड हिंगोली लोकसभा मतदार संघात काँग्रेसने जल्लोष साजरा केला तर संसदेच सोळावं वर्ष खा. सुभाष वानखेडे यांना धोक्याच्या ठरला असून, त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात विजयाची हैट्रीक मारणारे सुभाष वानखेडे हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत संसदेत निवडणून गेले. लोकसभेतील विजयानंतर अनेक निष्ठावंत शिवसैनिकांशी त्यांचा समन्वय राहिला नव्हता. वानखेडे च्या या वागण्याने अनेक निष्ठावंत सैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत दुसर्या पक्षांशी घरोबा केला. नाराज कार्यकर्त्यांशी जमून घेण्यात वानखेडेनि स्वारस्य दाखविले नसल्यानेच मोदी लाटेने सुद्धा त्यांना तरले नसून अखेर त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

सोळावी लोकसभा, मे महीण्याची सोळा तारीख, आणि राजीव सातव यांना मिळालेली सोळाशे मतांची आघाडी पाहता सोळाचा आकडा खा. सुभाष वानखेडे यांच्यासाठी ठरले धोक्याचे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. सूर्यकांता पाटलांचा रुसवा, शिवाजी मानेंचा फुगवा आणि मराठ्यांनी चालविलेले जातीचे कार्ड राजीव सातव यांचा विजय रोखू शकले नाही. किनवट - माहूर विधानसभा मतदार संघातील खा. सुभाष वानखेडे यांचे कार्यकर्त्यांशी असलेले सख्यचं त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याने या मतदार संघातील मतदानाची वाढती टक्केवारीच वानखेडे यांच्या पराभवाचे ठोस कारण बनले आहे.

मोदी लाटेत न तरलेल्या सुभाष वानखेडेच्या पराभवाने अवघ्या सहा महिन्यावर येउन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी गुढग्याला बाशिंग बांधलेल्या नागेश पाटलांच्या राजकीय भवितव्यावर कुऱ्हाड कोसळली असून, आता विधानसभेलाही सुभाष वानखेडे यांनी आपले नशीब आजमावले तर नागेश पाटलांना खो बसण्याची दाट शक्यता आहे. येणारी राजकीय गणिते काहीही असली तरी काँग्रेस चे दोन खासदार निवडून आल्याने हदगाव - हिमायतनगरच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी