समस्या वाढल्या

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहराचा कारभार पाहणाऱ्या प्रभारी ग्रामविकास अधिकार्याची बदली झाल्यामुळे १५ दिवसापासून ग्रामपंचायतीचा कारभार ढेपाळला आहे. परिणामी शहर वासियांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, आता तर शेवटच्या महिन्यात पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. या प्रकाराकडे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी लक्ष देऊन तातडीने या ठिकाणी ग्राम विकास अधिकार्याची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.

मागील अनेक वर्षापासून हिमायतनगर शहरातील ग्रामविकास अधिकार्याचे पद रिक्त असून, समस्या मार्गी लागाव्यात म्हणून या ठिकाणचा कारभार पाच ते सहा महिन्यानंतर कोण्यातरी प्रभारीवर सोपविल्या जात आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकार्याची नियुक्ती करावी अशी मागणी होत असताना देखील वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. परिणामी शहरातील नागरी समस्या, पावसाळ्यापूर्वी रस्ते - नाल्यांची सफाई, अर्धवट राहिलेल्या अंगणवाडी बांधकाम, विहीतिल गाळ कडून पाणी समस्येवर मात करणे, सार्वजनिक नाल्योजानेतून गावात पाणी - पुरवठा करणे, कर वसुली, मासिक बैठका यासह अन्य कामे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यात सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणून समजली जाणार्या शहरातील ग्राम पंच्यातीत नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे असेल तर, ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे हाल काय असतील याचा विचार न केलेलाच बरा. कारण तालुक्यात जवळपास पच ग्रामसेवकाच्या बदल्या झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या बदल्यात तालुक्यात किती ग्रामसेवक हजार झाले हे अजूनही कोडेच आहे.

ग्रामसेवक नसल्याने निकुष्ठ कामाचा सपाटा

सध्या हिमायतनगर शहरातील अनेक वार्डात कोटयावधीच्या निधीतून सिमेंट रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. सदरची कामे खुद्द काही ग्रामपंचायत सदस्य करीत असून, याकडे लक्ष देण्यासाठी ग्रामसेवक नसल्यामुळे संबंधितानी निकृष्ठ कामाचा सपाटा सुरु केला आहे. सदर कामात माती मिश्रीत रेती, विहीच दगड तसेच सिमेंटचे कमी प्रमाण वापरून लाखोचे काम हजारात उरकून मालामाल होऊ पाहत आहेत. एवढेच नव्हे तर सादर सत्याच्या कामावर कुरिंग केली जात नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.राजकीय नेते व अभियंत्याशी मिलीभगत करून कामे निकृष्ठ दर्जाची केली जात असल्याने पहिल्या पावसातच रस्त्याच्या कामाची पुरती वाट लागण्याची शक्यता बळावली आहे.

तर रस्ते कामासाठी नाल्या केल्या गायब

शहरतील दत्त नगर प्रभाग क्रमांक २ मध्ये ग्राम पंचायतीने सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे करून याकामासाठी सांडपाण्याच्या नाल्या अदाठला ठरत असल्याचे कारण समोर करून चक्क एक नालीच बुजउन गायब केली आहे. याबाबत संबंधित ग्राम पंचायतीच्या गुत्तेदारास विचारले असता पुन्हा करून देऊ असे सांगून वेळ मारून नेल्याने या परिसरातील घाण पाणी आता थेटरस्त्यावर साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी