राजस्व अभियानाची माहिती

राज्यातील पहिला प्रयोग नांदेड जिल्ह्यात
पथनाट्याच्या माध्यमातून 64 गावात आता राजस्व अभियानाची माहिती

नांदेड(अनिल मादसवार)सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत नांदेड जिल्हयातील 64 गावात आता "दूर झाल्या नागरिकांच्या व्यथा" या पथनाट्याच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध योजना जनमाणसापर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. राजस्व अभियानातील राज्यातील हा पहिला प्रयोग नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या पथनाट्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते नारळ फोडून विष्णुपुरी येथे करण्यात आला. यावेळी या पथनाट्याचे लेखक दिग्दर्शक तथा अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि सरपंच लक्ष्मीबाई कांबळे यांची प्रमुख उपस्थितीती होती. 


नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या पथनाट्यामध्ये भुमिका वठवल्या असून या पथनाट्याचे संहिता लेखन केलेल्या अपर जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी प्रास्ताविकात सांगितले की, लोकाभिमूख प्रशासनासाठी महसूल विभागाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पथनाट्य या माध्यमाचा उपयोग करण्यात आला असून अशा प्रकारचा प्रयोग करणारा नांदेड जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे. जिल्ह्यात राजस्व अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. गतवर्षी 1 लाख 27 हजार प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. हजारो पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले. लोकांच्या मदतीसाठी या अभियानाची अधिकाधिक नागरिकांना माहिती व्हावी यासाठी हे पथनाट्य बसविण्यात आले आहे. याद्वारे 64 गावातील जनतेशी संवाद साधत लोकसहभाग वाढविण्याचा व जनजागृतीचा प्रयत्न राहणार आहे, असेही ते म्हणाले. 


या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजु हंबर्डे, माजी सदस्य साहेबराव हंबर्डे, अप्पाराव कल्याणकर, मोहनराव हंबर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. निशिकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्रविण फुलारी, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, गटशिक्षणाधिकारी के. पी. सोने, तहसिलदार महादेव किरवले, मुख्याध्यापिका अंजली देव यांच्यासह पथनाट्यातील कलाकार साईप्रसाद ढवळे, प्रदिप शिंदे, विवेक नरवाडे,‍ सिद्धांत गजभारे, योगेश गच्चे, शहादत्त पुय्यड, राहुल कावळे, गोविंद वाघमारे, विष्णुदास उमाटे, रामप्रभु जोंधळे, विशाल वारेकर यांची व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर. जी. कुलकर्णी यांनी केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक रेनगुंटवार, प्रफुल कुलकर्णी, महसूल विभागाचे संजय नागमवाड, एन. एस. भोसीकर, के. बी. भोसीकर, मंगेश वांगीकर, नितीन भडंगे आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी