सत्कार

नवनिर्वाचित पत्रकार संघटनेचा आ.जवळगावकर यांनी केला सत्कार

हिमायतनगर(वार्ताहर)महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नूतन कर्याकारीणीस आ.माधवराव पाटील जवळ गावकर यांनी शाल श्रीफळणे सत्कार करून आगामी कार्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून, तालुकाध्यक्षपदी पांडुरंग गाडगे, कार्याध्यक्षपदी प्रेमकुमार धर्माधिकारी, उपाध्यक्षपदी दत्ता शिराणे, उपाध्यक्षपदी परमेश्वर शिंदे, सचिवपदी अनिल मादसवार, कोषाध्यक्ष पदी अनिल भोरे, संघटक पदी कानबा पोपलवार, सहसचिवपदी साईनाथ धोबे, सहकोषाध्यक्ष पदी फाहद खान, सल्लागार म्हणून भास्करकाका दुसे, चांदराव वानखेडे, सदस्यपदी दिलीप शिंदे, संजय कवडे, धम्मपाल मुनेश्वर, छायाचित्रकार म्हणून विष्णू जाधव, ज्ञानेश्वर गोडसेलवार यांची निवड केल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष अभयकुमार दांडगे, सरचिटणीस रुपेश पाडमुख, कार्याध्यक्ष कृष्णा जोमेगावकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे. निवडीची माहिती हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी पत्रकार संघटनेची भेट घेवून शाल श्रीफळ देवून सत्कार केला. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देवून पत्रकार भवनाचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी जी.प.सदस्य सुभाष राठोड, विक्स पाटील देवसरकर, ज्ञानेश्वर शिंदे, मुन्ना खडकीकर, बंडू पाटील, आत्माराम देवसरकर, संजय मादसवार, मारोती वानखेडे, मिराशे, हातमोडे आदींसह अनेक पत्रकार यांची उपस्थिती होती. साईनाथ धोबे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी