चिमुकल्यांची धम्माल

किड्स वर्ल्ड नृसिंह इंग्लिश स्कूलच्या स्टेजवर चिमुकल्यांची धम्माल

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील किड्स वर्ल्ड नृसिंह इंग्लिश स्कूलच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील ३ ते ५ वर्षाच्या चिमुकल्यासाठी संचालक संजय मारावार यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात लहान-लहान मुलामुलींनी धम्माल गीतांवर आपल्या अंगी असलेल्या कला - गुणांचे सादरिकरण करून उपस्थीतांना मंत्रमुग्ध केले.

शहरातील किड्स वर्ल्ड नृसिंह इंग्लिश स्कूल या शाळेच्या वतीने प्रती वर्षी चुमुकल्यांच्या अंगी असलेल्या कला - गुणांना चालना मिळावी. या उद्देशाने विविध कला गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. बुधवारी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन येथील सरपंच गंगाबाई शेषेराव शिंदे यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सुशील चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणुन राजा भगीरथ विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, नांदेड न्युज लाइव्ह्चे संपादक अनिल मादसवार, माजी उपसरपंच यलप्पा गुंडेवार, पद्मशाली समाज संघटनेचे अध्यक्ष विश्वंभर मादसवार हे होते.

कार्यक्रमाची सुरवात स्वागत गीताने करण्यात आली. यात ३ ते ५ वर्षाच्या लहान बालकांनी सध्याचा चालू घडा -मोडी, देशभक्ती अश्या गीतांवर नृत्य व लघुनाट्य सादर करून, उपस्थितांची मने जिंकली. देव श्री गणेशा... राधा हि बावरी... सांग सांग भोलानाथ... नाच रे मोरा आंब्याच्या बनात... धिंग चिका..धिंग चिका... धींताचा चिता चिता.. धींताता ता... देश रंगीला...चला जेजुरीला जाऊ... कुण्या गावाचा आला पाखरू.... मला लागली कुणाची उचकी... दरिया किनारे एक बंगलो रे... यासह अन्य गीतांवर दिलखेचक अदाकारी करून चिमुकल्यांनी उपस्थितांना भारावून सोडले. कु.मादसवार हिच्यासह सर्व चिमुकल्यांनी सादर केलेल्या गीतांना प्रेक्षकांनी व पालकांनी भरभरुन दाद देवून बालकलाकाराचे कौतुक केले. या संस्थेचे संचालक मारावार सर, प्राचार्य मंजुषा हनवते, शिक्षिका डाके मैडम, राउत मैडम, जोशी मैडम, सारंग मैडम, रामदिनवार सर्वानी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी