प्रशिक्षण

पवना - टेंभी येथील स्वयंसहायता बचत गटांना प्रशिक्षण

हिमायतनगर(वार्ताहर)पंचायत समितीच्या वतीने टेंभी येथील स्वयंसहायता बचत गटांना दि.०६ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नति अभियानाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी शेकडो महिलांनी उपस्थिती लावली होती.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड व पंचायत समिती हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नति अभियानाअंतर्गत तालुक्यातील टेंभी आणि पवना येथील स्वयंसहायता बचत गटांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानिमित्ताने दि.०४ फेब्रुवारी ते ०६ रोजी च्या काळात ग्रामपंचायत कार्यालय टेंभी येथे बचत गटातील महिलांना बैंकेत आर्थिक व्यवहार करीत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आणि बचत गटांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली. बचत गटांनाबरोबरच प्रत्येक सभासदाचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी बचत गटांची गरज असून, शासनाच्या बचत गटांना देण्यात येणाऱ्या योजनांविषयी सखोल असे मार्गदर्शन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री साईनाथ चिंतावार यांनी उपस्थित महिलांना दिली. यावेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष श्रीमती सरस्वताबाई सुरोशे, ए.एस.जोंधळे, गटसमन्वयक वानखडे, प्रशिक्षक काळू राठोड, श्री काळबांडे, आदींसह महिला बचत गटातील सदस्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी