एक कोटी वीस लाख मंजूर

घारापुर रस्त्यासाठी एक कोटी वीस लाख मंजूर...आ. जवळगावकर


हिमायतनगर(वार्ताहर)उमरखेड कडे जाणाऱ्या नडव्यापासून ते घारापुर पर्यंतच्या पक्क्या रस्त्यासाठी हदगाव - हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी एक कोटी वीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याचे सांगून दि.१७ सोमवारी सकाळी १० वाजता रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून अंदाज पत्रकानुसार काम करण्याच्या सूचना दिल्या.

मागील अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या व स्वातंत्र्य नंतर आजपर्यंत पक्क्या रस्त्यासाठी घारापुर वासियांनी केलेला संघर्ष लक्षात घेता या रस्त्याचा विकास करून घारापुर हे गाव बारमाही रस्त्याला जोडण्यासाठी शासनाचा एक कोटी वीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून घारापुर वासियांना सोसाव्या लागणाऱ्या मरण यातना आत संपल्या असल्याचे प्रतिपादन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केले. ते भुपिपुजन केल्यानंतर नागरिकांच्या वतीने शांतीलाल सेठ यांच्या हस्ते करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी लक्ष्मण शक्करगे, प्रभाकर मुधोळकर, विजय शिंदे, प्रकाश कोमावार, जी.प.सदस्य सुभाष राठोड, जनार्धन ताडेवाड, विकास पाटील, भास्कर चिंतावार, दिलीप लोहरेकर, माने साहेब, ज्ञानेश्वर शिंदे, सुभाष शिंदे, सरदार खान, हानुसिंग ठाकूर, बाबुराव होनमने, रफिक सेठ,  आदींसह अनेक नागरिक, शेतकरी, व्यापारी उपस्थिती होती.
    
वरदविनायक मंदिर परिसराचा उद्धार करणार .. जवळगावकर  

नुकतेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा हिमायतनगरच्या वतीने येथील कनकेश्वर तलावाचा विकास करून गणपती विसर्जनासाठी पायऱ्या बांधून देवून वरद विनायक मंदिर परिसराचे सौंदर्य वाढविण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज आ.जवळगावकर यांनी कनकेश्वर तलावाजवळील वरद विनायक मंदिरास भेट देवून पाहणी केली. तसेच तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसराचा विकास आराखडा करून तीर्थ क्षेत्रच्या माध्यमातून विकास कर्नय्चे ठोस आश्वासन दिले. यावेळी जी.प.सदस्य सुभाष राठोड, विजय शिंदे, प्रकाश कोमावार, जनार्धन ताडेवाड, संजय माने, पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव अनिल मादसवार, उपाध्यक्ष परमेश्वर शिंदे, संघटक कानबा पोपलवार, धम्मा मुनेश्वर आदींची उपस्थिती होती

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी