दोन वर्षापासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
हिमायतनगर(वार्ताहर)मागील दोन वर्षापूर्वी मारहाण व लुटमार करून फरार झालेल्या एका आरोपीस हिमायतनगर पोलिसांनी चौपाटी परिसरात सापळा रचून जेरबंद केले आहे.
मागील दोन वर्षपूर्वी येथील चौकात मारहाण व लुटमार केल्या प्रकरणातील आरोपी युनुस खान उर्फ पोचू आयुब खान रा.उमरचौक हा फरार झाला होता. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस स्थानकात त्याच्यावर कलम ३९२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याच्या शोधात पोलिस असताना दोन वर्षापासून त्याने गुंगार देत हैद्राबाद निझामाबाद , औरंगाबाद अश्या ठिकाणी आश्रय केले होते. बऱ्याच वेळा पोलिसांनी शहरात आल्यावर त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या येण्यापुर्वीच तो फरार होण्यास यशस्वी झाला होता. दि.१७ रोजी तो हिमायतनगर शहरात आल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून तो चौपाटी येथे येणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून त्यास जेरबंद केले. येथील ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्रे सोनवणे यांच्या मागदर्शनाखाली पोलिस नाईक अप्पाराव राठोड व सुभाष कदम यांनी हि कामगिरी बजावली, पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच त्याच्या सोबतच्या अन्य फरार असलेल्या दुसर्या आरोपीस तातडीने अटक करावे अशी आपेक्ष व्यक्त होत आहे.