दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

एड.शिवाजी जाधव यांच्या संपर्क दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद 


हिमायतनगर(अनिल मादसवार)दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे वकील तथा वसमत येथील माजी आ.मुंजाजीराव जाधव यांचे सुपुत्र एड.शिवाजी मुंजाजीराव जाधव यांनी दि.०१ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर हिंगोली लोकसभा मतदार संघात कार्यकर्ते जोडो संपर्क अभियानाला सुरुवात केली असून, पहिल्या दिवशी हिमायतनगर, किनवट, माहूर, महागाव, हदगाव, उमरखेड अश्या त्यांच्या या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा उत्सफ़ुर्त्पने प्रतिसाद मिळाला आहे. 

जाश जशी लोकसभा निवडणुकीचे दिवस जवळ येत आहेत, तास तसे राजकीय वातावरण तापत असून, संभाव्य इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या काळासाठी अनुकूल वातावर निर्मित्ति करण्यात अग्रेसर झाले आहे. याच अनुषंगाने वकीली पेषेनंतर राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी मुळचे वसमत येथील रहिवाशी असलेले तथा दिल्ली सर्वोच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करून नावलौकिक मिळवणारे एड.शिवाजी जाधव यांनी पक्षाचे सर्वेसर्वा मा.शरदचंद्रजी पवार यांनी दिलेल्या संकेतानुसार हिंगोली लोकसभेतून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली असून, कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यासाठी तालुका, शहराच्या ठिकाणी भेटी देत आहेत. भेटी दरम्यान त्यांच्या समवेत एड.विजय भोपी, पाषा सिद्दिकी, जावेद अब्बास, मुजाहिद शकिद, कोंडाबा इंगोले, एड.ववले, वसमतचे नगरसेवक अफसर भाई, प्रकाश कडतन, इम्रान पठाण, मुजीद अफसर, जाकीर शेख, खाजखान पठाण, हिमायतनगर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नागोराव पतंगे, सरदार खान, इरफान खान, उदय देशपांडे, अनंता देवकते, मित्रपक्ष काँग्रेस आयचे जी.प.सदस्य सुभाष राठोड, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराम पाटील, डॉक्टर गफार, यांची उपस्थिती होती.    

आज दि.०१ फेब्रुवारी रोजी हिमायतनगर येथील विश्राम ग्रहावर छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून पुढील वाटचाल व ध्येय धोरणांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच मी स्वतःचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवीत नाही, मला शेतकरी, विद्यार्थी, सामान्य नागरिक व महिलांच्या विकासासाठी कार्य करण्याची प्रबळ इच्छा आहे. मतदार संघात फिरत असताना खासदारबद्दल जनतेत नाराजी असल्याचे उघडपणे नागरिक बोलत असून, या भागातील जनता नवीन नेतृत्वाच्या शोधत असल्याचे जाणवले आहे. त्यामुळे आगामी काळात  पक्षाने संधी दिल्यास मी सर्व तयारीनिशी निवडणूक लढविणार. तसेच जनतेच्या कल्याणासाठी  अहोरात्र परिसराम घेवून अर्धावर राहिलेला विकासाच अनुशेष पवार साहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण करणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. 

महत्वाचे म्हणजे स्वातंत्र्यापासून हिंगोली लोकसभेतून सर्व तालुक्याला नेतृत्वाची संधी मिळाली, परंतु या पासून वसमत तालुका वंचित राहिला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भातील वसमतसह इतर भागाचा त्या मानाने विकास झाला नाही. याची उणीव भरून काढण्यासाठी वसमत तालुक्यातून नेतृत्वाची संधी मिळावी अशी रास्त अपेक्षा जनतेच्या तोंडून व्यक्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, कानबा पोपलवार, गंगाधर वाघमारे, दत्ता शिराने, अनिल भोरे, प्रेमकुमार धर्माधिकारी, रवि राठोड, परमेश्वर शिंदे, सुभाष गुंडेकर, शे.इस्माईल, फाहद खान, संजय कवडे, जांबुवंत मिराशे, सचिन माने, धम्मपाल मुनेश्वर, असद मौलाना, मारोती वाडेकर, सोपान बोम्पिलवार यांच्यासह अनेक पत्रकार, छायाचित्रकार यांची उपस्थिती होते.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी