छापा..

हिमायतनगरात अन्न व औषध प्रशासनाचा छापा.. दीड लाखाचा गुटखा जप्त 


नांदेड(अनिल मादसवार)स्थानिक पोलिस व राजकीय वरदहस्त असलेल्या शहरातील दोन बड्या किराणा दुकानदारांकडून तर एका पान पासला टपरीधारकाकडून होलसेल गुटखा विक्रीचा धंदा चालविला जात आहे. त्याच्या मार्फत शहरातील पान टपर्या, छोटे किरण दुकान, हॉटेल वाल्यांना विमल, सितार, आर.एम.डी. सह सुगंधी मासल्याचा पुरवठा केला जात आहे. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यावरून आज दि.३१ जानेवारी रोजी अन्न व औषध प्रशासनाने हिमायतनगर येथील एका गोडावून वर छापा टाकून दीड लाखाचा गुटखा पकडून पोलिस कार्यवाही करण्यात अली आहे. 

हिमायतनगर येथील ठाण्याचा कारभार नूतन पोलिस अधिकार्यांकडे सोपविल्यानंतर शहरात अवैध्य धंदेवाल्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. पोलिसांना हप्ता देवून शहरात रेशन, केरोसीन, मटका, अवैध्य दारू, गुटख्याचा गोरखधंदा तेजीत चालविला जात आहे. यामुळे ३ रुपयाला मिळणारी पुडी हि पाच ते सात रुपयाला विकली जात आहे. तसेच गुटख्याच्या होलसेल पुड्याच्या किमतीतही ९०  ते ७० रुपयाने वाढ करण्यात आली आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी आणली असताना पूर्वीच्या पेक्षा पोलिसांच्या हप्त्यात दुप्पटीने वाढ करून खुले आम हा धंदा चालविला जात आहे. यामुळे शहरातील लहान बालकांसह शेतकरी, मजूरदार गुटख्याच्या आहारी गेले असून, अव्वाच सव्वा दारात गुटख्याची पुडी खरेदी करून तलब भागवीत आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी जागरूक जनता व स्वतः पालकांना पुढाकार घेवून स्थानिकाच्या जागरूक नेत्यांना हि बाब निदर्शनास आणून दिली परंतु काहीच फरक पडला नाही. उलट राजकीय वरद हस्त असलेल्या गुटखा माफियांनी हा धंदा सुरक्षित रित्या चालू ठेवून अल्पावधीत मालामाल होण्याच्या प्रयत्न चालविला आहे.  

अश्याच छुप्या पद्धतीने गुटख्याचा साठ करून ठेवल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला काहींनी दिली होती. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री.पी.डी.गळाकाटू, अन्न निरीक्षक श्री संतोष कनकावाड, भारत भोसले, कृष्ण जयपूरकर, स्थानिक पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण, जमादार कोठुळे, कागणे यांनी शुक्रवारी हिमायतनगर शहरातील बाजार चौकातील सीरंजणी रस्त्यावर असलेल्या एका बड्या व्यापाऱ्याच्या गोडावून छापा टाकला. या ठिकाणी काळ्या बाजारात विक्री करण्यासठी ठेवलेला विमल पान मसाला अंदाजे ०१ लाख ८ हजार रुपयेच माल, वि.वन.सुगंधी तंबाखू ३६ हजार असा एकूण ०१ लाख ४४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धंद्याचा खरा आरोपी अजून पडद्याआड असून, या प्रकरणी शे.हाफिज शे. आलम याच्यावर अन्न सुरक्षा माणदे कायदा कलम २६ व 27 भादवी २७२, २७३, १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीमुळे अवैध्य धंदेवाल्यात एकच खळबळ उडाली असून, अन्य गुटखा व्यापार्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलविल्याची चर्चा शहारत सुरु आहे.  

बंदी झुगारून गुटख्याची राजरोसपणे विक्री...

गुटख्यापासून मिळणा-या वार्षिक सुमारे शंभर कोटींच्या उत्पन्नावर पाणी फेरून कर्करोगाला निमंत्रण देणा-या गुटख्याच्या विक्रीवर राज्य शासनाने सन २०१२ ला गुटख्याचे उत्पादन व विक्रीवर बंदी घातली. दोन वर्षापासून कुटखा विक्रीवर बंदी असूनही नांदेड जिल्ह्यातील विविध शहरांत गुटख्याची खुलेआम विक्री होऊ लागल्याने फौजदारी खटला करण्याचे आदेश शासनाने अन्न व औषध प्रशासन अधिका-यांना दिले त्यानुसार नांदेड जिल्ह्यातही अनेक मोठ्या कारवाया करण्यात आल्या. परंतु अजूनही राजकीय वरदहस्त असलेल्या काही गुटखा माफियांकडून राजरोसपणे गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी