प्रजासत्ताक दिन

तालुक्यात ठीक ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 




हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील तहसील कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत तहसीलदार श्री गायकवाड यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी प्रथम पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने भारत माता कि जय होचा नारा देण्यात एवुन गणराज्य दिन चिरायु होवो, अश्या शब्दात शुभेच्छा दिल्या. यावेळी तहसील कार्यालयात आ.जवळगावकर यांना उपस्थित मान्यवर व नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छाना उत्तर देताना जवळगावकार म्हणाले कि, सर्व जनतेच्या सहकार्याने मी हदगाव - हिमायतनगर तालुक्यात विकास कामांसाठी निधी खेचून आणण्यात यशस्वी झलो. आगामी मार्च नंतर आणखीन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. आत्ता एकट्या हिमायतनगर शहरासाठी ०१ कोटी ०५ लाखाचा निधी उपलब्ध झाला असून, यातून विकास कामे सुरु आहेत. तसेच मागील चार वर्षात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालीत. आगामी काळात बोरी रस्ता पूर्ण करण्यासठी ०१ कोटी २० लक्ष रुपयाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, लवकरच यास मंजुरी मिळणार आहे. पळसपूरकडें जाणाऱ्या नडव्याच्या पुलाची समस्या आगामी मार्च महिन्यातील बजेटमध्ये मंजुरी देवून मार्गी लावण्यात येईल. कामारी रस्त्यासाठी ४ कोटी रुपये मंजूर झाले असून, लवकरच काम सुरु होईल. तसेच हिमायतनगर शहराला नगरपालिकेचा दर्जा मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलून लवकरच हा प्रश्न सोडविण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी मंचावर तहसीलदार श्री गायकवाड, नायब तहसीलदार श्री.देवराय, जी.प.सदस्य सुभाष राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराम पाटील करंजीकर, जेष्ठ पत्रकार भास्कर दुसे, यांची उपस्थिती होती.

शहरातील पोलिस स्थानक, भारतीय स्टेट बैंक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती, महाराष्ट्र ग्रामीण बैंक, सेवा सहकारी सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय सर्व शासकीय निमशासकीय शाळा, महाविद्यालयात २६ जानेवारी निमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षक, शहरातील नागरिक, विद्यार्थी, अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच तालूक्यातील टेंभी, सिरंजणी, खडकी बा, सरसम बु, मंगरूळ, कामारी, पोटा बु, आदी ठिकाणी जी.प.शाळा, ग्रामपंचायत, उप-आरोग्य केंद्र या सर्व ठिकाणी सकाळी ०७.३० पासून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्या त्या ठिकाणचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, मुख्याध्यापक, नागरिक, मोठ्या संखेने उपस्थित होते. तर या दिनानिमित्त अनेक शाळांवर विविध खेळ, स्पर्धा, सांकृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु होती.  

वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
-------------------------------------------------

हिमायतनगर(वार्ताहर)१८ डिसेंबर रोजी पंचायत समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्वच्छता वक्तृत्व स्पर्धेत निवडलेल्या विद्यार्थ्यांना २६ जानेवारी रोजी आ.माधवराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यात वरिष्ठ महाविद्यालयातील अंकुश शिवाजी पवार यांना ५ हजार रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस, योगेश नारायणराव चिलकावार यान दुसर्या क्रमांकाचे ३ हजार रुपयाचे पारितोषिक व साईनाथ विठ्ठल देवराये यास तिसर्या क्रमांकाचे २ हजारचे बक्षीस देण्यात आले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातून दीक्षा अरविंद येरेकार हिस प्रथम क्रमांकाचे ५ हजारचे बक्षीस, कविता संभाजी कदम हिस द्वितीय क्रमांकाचे ३ हजाराचे बक्षीस तर दिपाली माधवराव तुळसे हिस तृतीय क्रमांकाचे २ हजाराचे बक्षीस देण्यात आले.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी