सामाजिक सलोखा

सामाजिक सलोखा राखणे प्रत्येक जागरूक नागरिकांचे कर्तव्य ..चिखले




हिमायतनगर(अनिल मादसवार)सण आणि उत्सव काळात नागरिकांनी जागरूक राहून सामाजिक ऐक्य व शांतता कायम ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक जागरूक नागरिकांची असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी केले. ते हिमायतनगर येथे ठाण्याच्या वार्षिक निरक्षण करण्यासाठी आल्यानंतर घेण्यात आलेल्या सान्मन पत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रेय कांबळे, पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण यांची उपस्थिती होती.

हिमायतनगर पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले हे सकाळीच ठाण्यात हजार झाले होते. प्रथम त्यांनी पोलिस कर्मचार्यांनी परेड घेवून तपासणीला सुरुवात केली. त्यानंतर कर्मचार्यांची शारीरिक तपासणी, ठाण्यातील नोंद पुस्तिका, इमारतीची पाहणी, गुन्हेगारीचा आढावा, शास्त्र साठा, दारुगोळा आदी ठाण्याच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच हिमायतनगर तालुका व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उत्कृष्ठ कार्य करणारे गणेश मंडळ, पत्रकार, आणि समाजसेवक, पोलिसमित्र यांना मार्गदर्शन केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, सण उत्सव शांततेत पार पाडणे, व जातीय सलोखा टिकून ठेवण्यासाठी केवळ वर्दीतील पोलिसांवर अवलंबून न राहता ते प्रत्येक नागरिकांचे अद्य कर्तव्य आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांशी नागरिकांनी सोहर्दपूर्ण वागणूक ठेवणे गरजेचे असून, समाजात  घडणाऱ्या  वाईट घटना सांगण्याबरोबर पोलिस दलातील कर्तव्यनिष्ठ कर्मचार्यांचे आणि अधिकाऱ्यांचे कौतुकही नागरिकांकडून होण्याची अपेक्ष त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर पोलिस पाटलांचा दरबार भरविण्यात येवून, अडी -अडचणी समस्यावर चर्चा झाली.

यात गणेश उत्सव काळात शांतता प्रस्तापित करणाऱ्या गणेश मंडळांना व सहकार्य करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्ती आणि पत्रकारांचा तानाजी चिखले यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अन्वर खान, शाहीर बळीराम हनवते, जाफर लाला, विजय वळसे, ज्ञानेश्वर शिंदे, उदय देशपांडे, फेरोज खान युसुफ खान, सुनील चव्हाण, रफिक सेठ, सरदार खान, शकील भाई, योगेश चीलकावर, श्याम जक्कलवाड, अनंत देवकते, इरफान खान, पापा पार्डीकर, प.स.सदस्या लक्ष्मीबाई भवरे, चंद्रकलाबाई गुड्डेटवार, पोलिस पाटील सौ. मिराशे, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष कानबा पोपलवार, प्रकाश जैन, गंगाधर वाघमारे, पांडुरंग गाडगे, दत्ता शिराणे, दिलीप शिंदे, सचिन माने, फाहद खान, धम्मपाल मुनेश्वर, स.मन्नान, यांच्यासह पोलिस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.            

पत्रकार संघाकडून उत्कृष्ठ गणेश मंडळांना पाच हजाराचे बक्षीस घोषित
------------------------------------------------------------------------------
आगमी होणाऱ्या गणेशोत्सव काळात सामाजिक बांधिलकी जपत शांतता जातीय सलोखा निर्माण करणाऱ्या गणेश मंडळांना हिमायतनगर मराठी पत्रकार संघाच्या वतीने ०५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी माजी अध्यक्ष कानबा पोपलवार यांनी दिली. त्यास नांदेड न्युज लाइव्ह्चे संपादक अनिल मादसवार यांनी दुजोरा दिला.

गुत्तेदरास खडसावले
---------------------
गात दीड वर्षापासून कासव गतीने चालू असलेले हिमायतनगर पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे बांधकाम अर्धवट असून, हे काम तातडीने पूर्ण करून महाराष्ट्र दिनापर्यंत इमारत हस्तांतरित करण्याची तंबी गुत्तेदार संगणवार यांना अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली. यावेळी पोलिस कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी