अनंतात विलिन

जेष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे अनंतात विलिन

नांदेड(अनिल मादसवार)नांदेड येथील दैनिक प्रजावाणीचे संस्थापक जेष्ठ पत्रकार व स्वातंत्र्य सैनिक सुधाकरराव विनायकराव डोईफोडे यांच्या पार्थिवावर आज नांदेड येथील गोवर्धन घाट येथे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुधवारी सकाळी त्यांचे हैद्राबाद येथे एका खाजगी रुग्णालयात निधन झाले होते. त्यांच्या भाग्यनगर येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव आज अंतिम दर्शनास ठेवण्यात आले होते. सकाळी त्यांच्या निवासस्थानापासून अंतयात्रा काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने नागरिक अंतयात्रेत सहभागी झाले होते. गोवर्धन घाट येथे शासकीय सन्मानाने पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या फेरी हवेत झाडून सलामी देण्यात आली. शासनाच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी धीरजकुमार आणि पोलिस अधिक्षक विठ्ठलराव जाधव यांनी श्री. डोईफोडे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महापौर अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमर राजूरकर, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार शंकरअण्णा धोंडगे, मनपाचे आयुक्त जी. श्रीकांत, कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी झालेल्या शोकसभेत अनेक मान्यवरांनी श्री डोईफोडे यांच्या कार्यकर्तत्वाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला व त्यांना अभिवादन केले.

जी.प.सोमेश्वर शाळेत डोईफोडे यांना श्रद्धांजली
---------------------------------------------------

नांदेड(प्रतिनिधी)शहरापासून जवळच असलेल्या सोमेश्वर जी.प.शाळेत प्रजावाणीचे संस्थापक, संपादक, जेष्ठ स्वातंत्र्य सैनानी सुधाकरराव डोईफोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठलराव मुखेडकर, सहशिक्षक डी.डी.हिंगमिरे, पत्रकार आनंदा बोकारे, सहशिक्षिका सारिका येरमवार, सौ.जयश्री मुंडे, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी