ऐसा पत्रकार होणे नाही !

ऐसा पत्रकार होणे नाही !

सुधाकरराव डोईफोडे यांच्या निधनाने आचार्य अत्रे.अनंत भालेराव यांचा वारसा सांगणारी पत्रकारिता खंडीत होत आहे.आयुष्यभर संघर्ष करीत आणि संघर्ष किंवा आंदोलन नसले तर ते ओढवून घेणारे चळवळखोर पत्रकार पुन्हा होणे नाही. माधव गडकरी यांच्या प्रमाणेच सुधाकरराव विविध चळवळीत सहभागी व्हायचे आणि विविध विषयात रस घेत त्या विषयाला सोपे करुन लोकांच्या पुढे मांडणे हा त्यांचा आवडता छंद होता. किती तरी इश्यू घेऊन आणि त्यांचा सतत नव्हे तर काहींचा आयुष्यभर पाठपुरावा करून त्यानी " प्रजावाणी " दैनिक हे आंदोलनाचे हत्यार बनविल्याने हे दैनिक कुठल्या कुठे पोचले आहे.त्यासाठी त्यांना सतत संघर्ष करावा लागला.खस्ता खाव्या लागल्या आहेत, अनेक खटले ओढवून घ्यावे लागले आहेत. त्यामुळेच लोकांना हे दैनिक आपले दैनिक वाटते आहे.

प्रजावाणीतील विविध विषयांवर लिहिलेल्या व प्रचंड गाजलेल्या अग्रलेखांचा शब्दबाण हा संग्रह नवीन संपादकांना जसा मार्गदर्शक आहे तसा तो मराठवाड्याच्या विकासाचा इतिहासही आहे. त्यांच्या साक्षेपी लिखाणाची साक्ष देणारे लिखाण यात आलेले असले तरी तरी त्याचे बोचरी आणि विखारी टीका असलेले अग्रलेख या संग्रहात नाहीत ज्या त्यांनी अनेक मादान्धाना लोळविले होते.वयाच्या बाराव्या वर्षी वृत्तपत्रीय लेखनाचा श्रीगणेशा करणाऱ्या डोईफोडे यांनी १९५६ मध्ये म्हणजे वयाच्या १९व्या वर्षी 'लोकसत्ता'चे वार्ताहर म्हणून कारकीर्द सुरू केली. तेव्हापासून त्यांचा प्रवास विविधांगी अनुभवांची शिदोरी गोळा करीत सुरूच राहिला होता.मराठवाडय़ातील नव्हे तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार व विकास चळवळीतील कृतिशील व्यक्तिमत्त्व म्हणून डोईफोडे यांनी प्रामुख्याने गेल्या दोन दशकांत वेगळा ठसा उमटवि आहे. या बाबतीत त्यान्ह्ची बरोबरी कोणीही करणार नाही त्यांना विविध मानसन्मान मिळाले.

ते त्यांच्या पत्रकारितेचा गुरव कार्नारेपूर्स्कार मानले पाहिजेत.परवाच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता डोईफोडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण स्वामीजींनी स्थापन केलेल्या पीपल्स कॉलेजमध्येच झाले. आणि त्यानी उभारलेल्या लढ्याचा आभास करून तो तरून पिढीला समजून देणाऱ्या लेखकाचा हा गौरव होता या थोर सेनानीने समाजात रुजविलेली मूल्ये त्यानी जन्मभर पाळली होती. आचार्य अत्रे ,दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव,माधव गडकरी या पत्रकारानी महाराष्ट्रातील पत्रकारितेची दुसरी पिढी घडविली. डोईफोडे यांना त्यांच्यासोबत कामाची संधी मिळाली नसली, तरी आचार अत्रे यांना समोर ठेऊन आणि अनंत भालेरावांना गुरुस्थानी मानत 'प्रजावाणी' दैनिकाच्या माध्यमातून पत्रकारितेत दबदबा निर्माण केलाव अनेक शिष्यही घडविले जे पुण्या मुंबईच्या वृत्तपत्रात पुढे महत्वाच्या पदावर काम करीत राहिले.. आजचा प्रजावाणी व्यवसाईक वाटत असला आणि ती काळाची गरज असली तरी व्यवसायाची वाट सोडून एक व्रत म्हणून सुधाकारावांनी पत्रकारिता केली. अन्याय, अत्याचार, अनाचार दिसला तेथे त्यांची लेखणी तुटून पडली. आणि निर्व्यसनी पत्रकारितेचा कित्ता अनेक पत्रकारांना गिरवायला लावला क्वचित अनंतरावांशीही त्यानी पंगा घेण्यास कमी केले नाही. मराठवाडा विकास आंदोलन, आणीबाणीविरोधी आंदोलन, नामांतर लढा, रेल्वे आंदोलन, वैधानिक विकास मंडळासाठीची चळवळ या सर्व घडामोडींमध्ये डोईफोडे सातत्याने कृतिशील राहिले. पत्रकारितेचे असीतधारा व्रत पाळतानाच राजकारणातही संचार केला. नांदेडचे नगराध्यक्ष, खासदार झालेल्या व्यंकटराव तरोडेकर यांना १९६७च्या पालिका निवडणुकीत पराभूत करण्याची किमया त्यांनी केली होती. आयुष्यभर संघर्ष करीत आणि संघर्ष किंवा आंदोलन नसले तर ते ओढवून घेणारे चळवळखोर पत्रकार पुन्हा होणे नाही.माधव गडकरी यांच्या प्रमाणेच सुधाकरराव विविध चळवळीत सहभागी व्हायचे आणि विविध विषयात रस घेत त्या विषयाला सोपे करुन लोकांच्या पुढे मांडणे हा त्यांचा आवडता छंद होता. किती तरी इश्यू घेऊन आणि त्यांचा सतत नव्हे तर काहींचा आयुष्यभर पाठपुरावा करून त्यानी प्रजावाणी दैनिक हे आंदोलनाचे हत्यार बनविल्याने हे दैनिक कुठल्या कुठे पोचले आहे.त्यासाठी त्यांना सतत संघर्ष करावा लागला.खस्ता खाव्या लागल्या आहेत , अनेक खटले ओढवून घ्यावे लागले आहेत. त्यामुळेच लोकांना हे दैनिक आपले दैनिक वाटते आहे.

प्रजावाणीतील विविध विषयांवर लिहिलेल्या व प्रचंड गाजलेल्या अग्रलेखांचा शब्दबाण हा संग्रह नवीन संपादकांना जसा मार्गदर्शक आहे तसा तो मराठवाड्याच्या विकासाचा इतिहासही आहे. त्यांच्या साक्षेपी लिखाणाची साक्ष देणारे लिखाण यात आलेले असले तरी तरी त्याचे बोचरी आणि विखारी टीका असलेले अग्रलेख या संग्रहात नाहीत ज्या त्यांनी अनेक मादान्धाना लोळविले होते.हैद्राबाद मुक्ती संग्रामातील लक्षणीय प्रसंगावर लिहिलेले ‘त्यांचे पुस्तक नव्या पिढीला मुक्तीसंग्रामचा रोमहर्षक लढा समजून देणारा आहे. हैद्राबाद मुक्ती संग्रामावरच लिहिलेली त्यांची ‘परवड’ ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभ्यासक्रमात होती. म्हणून कोणी मोठी नव्हती तर तिची वाड्मयीन महत्ताही काही कमी नाही. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयनिर्मितीचा पुरस्कार शब्दबाणला प्रदान करण्यात आला होता . डोईफोडे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात सक्रीय सहभाग नोंदविला.वयाच्या ११ व्या वर्षी मनाई आदेश मोडून त्यांनी निजामविरोधातील मोर्चात सहभाग नोंदवून आपला निषेध नोंदविला होता.

यासाठी पोलिसांच्या काठ्याही खाव्या लागल्या. या आंदोलनात रस्त्यावरील बल्ब फोडणे, अमन कमेटिच्या सदस्यांवर शेणाचा मारा करणे, पॉम्प्लेट वाटणे, हत्यारांची वाहतूक करणे आदि कामे त्यांनी केली होती.तरीही काही जणांनी त्यांना या मुद्यावर विरोध केला व जन्मभर वैर पत्करले होत. आणीबाणीतील सत्याग्रहामुळे त्यांना १५ दिवसांची शिक्षाही भोगावी लागली. समाजवादी विचारसरणीचा पगडा असणार्‍या डोईफोडेंनी पुढे समाजवाद एक समाजवाद असा जप न करता आपले साक्षेपी विचार वेगळे आहेत असे सांगत जार्ज फर्नाडीस यांच्या सुरात सूर मिसळताना पोथीनिष्ठ समाजवाद्यांना उपदेशाचे डोसही पाजले होते.पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली असली तरी आणि आयुष्याच्या अखेर पर्यंत त्यांना कोर्टाची पायरी चढावे लागली असली तरी त्यांनी आयुष्यभर मराठवाडयाच्या विकासाची वकिली करूनप्रजावाणी व महाराष्ट्रातील विविध दैनिकांतून हे प्रश्न मांडले होते.

रेल्वे प्रश्‍नाचे गाढे अभ्यासक म्हणून ते केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जात, रेल्वेंच्या न्याय मागण्यासाठी अनेकवेळा ते रस्त्यावर उतरले होते. अगदी शेवटच्या आजारातही त्यांनी रुंदीकरणाचे काम कसे व्हायला हवे यावर आपले मत मांडले होते .ते म्हणजे चलता बोलता रेल्वे कोशच होते. त्यांचा खोलीत असलेलेया भारताच्या नकाशात वेवेगले रेल्वे मार्ग दाखवून प्रस्तावित रेल्वे मार्ग कुठून व कसे जायला हवेत हे नेहमी दाखवत असत. नियतकालिकामधून अगणित लेख लिहून डोईफोडे यांनी रेल्वे रूंदीकरणाची चळवळ जिवंत ठेवली होती. १९५२ पासून मनमाड ते नांदेड ब्रॉडगेज व्हावे म्हणून ते
प्रयत्नशील होते. रेल्वे प्रश्‍नावर त्यांनी वेळोवेळी व्यापक आंदोलने केली होती. नांदेडला जनतेचा अभूतपूर्व कर्फ्यू घडवून आणला होता. डोईफोडे यांचे नांदेड शहराच्या विकासात लक्षणीय योगदान होते.त्यांच्या सारखा पत्रकार पुन्हा होणे नाही! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. प्रजावाणी परिवारावर त्यांच्या निधनाने जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे त्यात आम्ही सहभागी आहोत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी