श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। बैलजोडी कुर्बानीसाठी घेऊन जात असल्याची माहीती मिळाल्यावरून गौरक्षक सोनु चौधरी व त्याचे मित्र यांनी पायी बैल जोडी नेत असलेल्या ईसमास विचारपुस केली. यावेळी चौकात असलेल्या सलिम याने "ईसका बहोत हो रहा है" म्हणत लोखडी रॉडने मारहान केल्याची घटना दि,२९ रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
गुरुवार दि,२९ रोजी बकरी ईद दिनी साय,६.३० वा गोरक्षक सोनु चौधरी वय २३ (फ्रेंड्स जीम चालक)व त्याचा मित्र अतिष राठोड वय २५ हे मोटार सायकलने जीम कडे जात असताना सोनूस फोन आला की, दत्तनगर येथील अरविंद जयस्वाल याच्या घरा समोरून एक इसम पायी बैल जोडी नेत असुन, सदरील बैलजोडी कुर्बानी करीता नेत आहे असे समजले. त्यामुळे चौधरी ने त्याचे मित्र मंगेश सुर्यवंशी, कालीदास नैताम, सचिन राठोड यास बोलावून टिपु सुलतान चौकातुन जयस्वाल याच्या घराकडे जात असतांना संजय किसन गायकवाड हा दोन बैल घेउन ईलु चौकाकडे येत होता.
त्यास विचारपुस केली असता सदरील बैलजोडीचे दाखले सलीम कुरेशी याच्या कडे आहेत. त्याला फोन लाउन बोलावतो असे गायकवाड म्हणाल्याने सोनु चौधरी यांने मंगेश व कालीदास यास पोलीस मदत बोलाविण्या करीता पोलीस स्टेशनला पाठविले. त्यादरम्यान सचिन व सोनु त्याठिकानी थाबले त्याचवेळी सलिम कुरेशी, बाबुशा ठेकेदार,आसिफ हसन,सलिम ॲटोवाला,अनिस चिनी ऊर्फ शोयब शेख, एजाज,सोहल शेख व मोईन व ईतर लोक तेथे आले व "ईसका बोहोत हो रहा है ईसे आज खत्म करेंगे" असे म्हणून सलीम ॲटोवालाने रॉड डोक्यात मारला व इतरांनी त्यांच्या हातातील काठ्यानी लाथाबुक्याने व दगडाने सोनु चौधरी यास जिवे मारण्याच्या उदेश्याने मारहान करत होते.
दरम्यान चौधरी यांचे मित्र व पोलीस येतांना दिसताच सर्वांनी घटनास्थळावरून पळ काठला. यात सोनु चौधरी यास मोठ्या प्रमानात डोक्यात मार लागला असुन, प्रथम माहूरच्या ग्रामीण रूग्णालय दाखल केले. डोक्यास अधिक मार असल्याने पुढील उपचार करीता यवळमाळ येथे हलविण्यात आले. घटनेचे गाभिर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकुष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरने यांनी रात्रीच धावघेत पाच जनाना अटक केली आहे. तर अनेक जण फरार झाले असून, त्यांचा शोध सूरू आहे. या घटनेच्या निषेर्धान माहुर शहर दि ३० रोजी बंद पुकारण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दाखल झाला असुन, माहूर शहरात तनावपूर्ण शातता आहे.
दि.२९ रोजी माहूर येथे सोनू चौधरी यास काही लोकानी मारहाण केली होती. त्या बाबत माहूर पोलिस ठाण्यात 10 आरोपी आणि त्यांच्यासोबत इतर यांच्या विरोधात भादवी 307(जीवे मारण्याचा प्रयत्न), 395( दरोडा) पोलिस आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. त्यातील महत्वाचे 5 आरोपी आता पर्यंत अटक केलेले आहेत . सर्व माहूर वासियानी खुप सहकार्य केलेले आहे असेच सहकार्य करून माहूर शरहरात शांतता राहील यासाठी मदत करावी. असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे . कोणतीही अफवा पसरू नका काही आक्षेपार्ह समजले तर तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क करावा असेही पोलिस निरीक्षक माहूर यांनी कळविले आहे.