हदगाव, शे चादपाशा| शहरात व तालुक्यात कुठं ही धूम्रपान करा कुठे ही थुंका व तंबाखू व गुटखाच्या पिचका-या सर्रास सार्वजनिक ठिकाणी मारण्यात येत आहे. यामध्ये नागरिकसह महाविद्यालयीन विद्यार्थीचा पण समावेश होताना दिसुन येत आहे.
'कोटपा 'कायद्याच अधिकार पोलिसाना असुन, ही पोलिस या बाबतीत काहीच कारवाई करत नसल्यामुळे खुलेआम धुम्रपान सार्वजनिक ठिकाणी होताना दिसुन येत आहे. अणखीन विशेष म्हणजे काही अल्पयीन मुले सुद्धा सिगारेट तंबाखूजन्य पदार्थाचे वापर करतांना दिसुन येतात. राज्यात बिडी व सिगारेट आणि गुटखा खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरी गंभीर बाबअशी की काँलेज शालेय विद्यार्थीसह तरुणामध्ये याचे प्रमाण वाढताना दिसुन येते. यावर आळा घालण्यासाठी 2018 च्या दरम्यान बिडी सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ सेवन बंदी कायदा (कोटपा ) चे खास प्रशिक्षण पोलिसाना देण्यात आले होते.
त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यावर 'कोटपा 'कायद्या अतर्गत कारवाई करण्याचे अधिकार पोलिसाना आहेत. या बाबतीत स्थानिय पोलिसाना याचा विसर पडला की काय...? आसा प्रश्न पोलिसाच्या कार्यशैलीवरुन दिसुन येत आहे. कारण सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करने थुकने आश्याची स़ख्या दिवसेंदिवस वाढत असतांना दिसुन येत आहे.