नांदेड| गेल्या तीन वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपीस गजाआड केले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पाहिजे व फरार आरोपीचा शोध घेवून अटक करण्याच्या सुचना दिल्या. त्यावरुन व्दारकादास चिखलीकर, पोनिस्थागुशा, नांदेड यांनी पथके तयार करुन आरोपींचा शोध घेतला असता पोस्टे शिवाजीनगर गुरनं 489/2021 कलम 326,323 भादवी मधील पाहिजे असलेला आरोपी प्रफुल्ल ऊर्फ अर्जितसिंग पिता गजानन चव्हाण वय 23 वर्षे व्यवसाय मजुरी रा. रामनगर, हदगाव जि. नांदेड ह.मु. नंदीग्राम सोसायटी नांदेड हा डी मार्ट कॅनल रोड, नांदेड येथे असल्याची गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाले. त्यावरुन त्याचा शोध घेतला असता सदर आरोपी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून पोस्टे शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीवर नांदेड जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन मध्ये अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे अभिलेखावर दाखल आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाथ कुमार, अपर पोलीस अधीक्षक, भोकर डॉ.खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, नांदेड शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, दत्तात्रय काळे, पोउपनि, स्थागुशा, पोना/बालाजी तेलंग, पोकॉ/विलास कदम, पोकॉ/धुमाळ, चापोकॉ/शेख कलीम यांनी पार पाडली.