नांदेड| महामानव,प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने वंचित बहुजन आघाडी व भिम टायगर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विमानतळ चौक,सांगवी (बु.),नांदेड येथे येत्या दि.८ डिसेंबरला संविधान बचाव परिषद व सुप्रसिद्ध गायक आकाश राजा गोसावी यांचा बुद्ध-भिम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रविभाऊ हाडसे, मुन्नाभाऊ वाठोरे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके तर, वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहेमद व गोविंद दळवी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तसेच,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हतीअंबीरे,संदिप ढगे,प्रशांत इंगोले,त्रिरत्नकुमार भवरे,विजय एंगडे,मिलींद गायकवाड,गजानन वैद्य,अनिल शिरसे,प्रकाश रायबोले,राष्ट्रपाल सावतकर,बौद्धाचार्य गौत्तम कदम,बाळू एकडे, आयुब खान,सम्राटराजे गायकवाड,प्रभाकर वाघमारे,कमलाकर दुधमल, भगवान तारु,शैलेश लवटे, शिवकन्या सीमा खरे, पिंटू लोहकरे,अमोल गायकवाड,संदिप मांजरमकर, निरंजनाताई आवटे,अर्जूननाना पंडित,कपिल भालेराव,राजू अप्पा कंधारकर, प्रशांत गोडबोले,विजय भंडारे,राजू सावते,सुनिल सोनसळे, केशव कांबळे,बंटी मोरे,गौत्तम वाठोरे, राहुल सोनकांबळे,पंकज वाठोरे,विशाल भालेराव,भिमराव हनवते,भिमशाहीर संदिपराजा हनवते,प्रतिक कदम,राजकुमार सिंघ टाक, संघपाल लोणे आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
येत्या दि.८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता संविधान बचाव परिषद व त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी-गायक मनोजराजा गोसावी यांचे चिरंजीव सुप्रसिद्ध गायक आकाश राजा गोसावी यांचा बुद्ध-भिम गीतांचा समाज- प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष निकेश लोंढे,संयोजक रविभाऊ हाडसे व आयोजक तथा,भिम टायगर सेना जिल्हाप्रमुख मायाभाऊ वाठोरे यांनी केले आहे.