अर्धापूर| केंद्र सरकारने एका महिन्यात पेट्रोल,डिझेल,गॅस ची विक्रमी दरवाढ केल्याने जनतेचे हाल होत असल्याने मंगळवारी काॅग्रेसच्या वतीने बसस्थानक ते तहसील कार्यालय केंद्र सरकारच्या दरवाढीविरोधात घोषणा देत मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
अर्धापूरात मंगळवारी सकाळी ११ वा. काॅग्रेसच्या वतीने सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, जिल्हा सचिव निळकंठ मदने, नगरसेवक मुसव्वीर खतीब, प्रवीण देशमुख,सोनाजी सरोदे,व्यंकटी राऊत,सलीम कुरेशी, गौस मुल्ला,भगवान तिडके,संचालक मोतीराम जगताप,दत्तराव सुर्यवंशी, संचालक संजय लोणे, पिंन्टू महाराज,पंजाबराव चव्हाण,प्रल्हाद सोळंके, सुनिल अटकोरे, बी सी सेलचे कामाजी अटकोरे, गणेश बोंढारे,अजमतखा पठाण,गोविंद गोदरे, गणेश राठोड, उमेश सरोदे,राजू पवार,शंकर ढगे, संजय गोवंदे,बालाजी कदम,गजानन कदम,राहुल हटेकर,अँड गौरव सरोदे,बाळू लोणे, बाबाराव सरोदे,पंढरीनाथ क्षीरसागर, अनिल थोरात,माटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी पेट्रोल, डिझेल,गॅस व खतांचे दरवाढ त्वरीत कमी झाल्याचं पाहिजे या घोषणांनी शहर दुमदुमले. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती,सर्व कार्यकर्ते १ कि मी पायी चालत आले. यावेळी लहानकर देशमुख, गव्हाणे,कोंढेकर यांनी केंद्र सरकारच्या दरवाढीविरोधात आपल्या भाषणातून तीव्र नाराजी व्यक्त केली,व जोपर्यंत हि दरवाढ मागे घेण्यात येणार नाही तो पर्यत लोकशाही मार्गाने रस्त्यावर हा लढा सुरुच राहिल असे सांगितले.