उस्माननगर,माणिक भिसे। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा. सुधाकरराव श्रृंगारे यांच्या पुढाकारातून कलंबर (बु. ) ता.लोहा येथील हनुमान मंदिरासमोर सांस्कृतिक सभागृह बांधकाम करण्यासाठी २५-१५ अंतर्गत सात लक्ष रूपयाचे पत्र सरपंच यांना देण्यात आले.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रयत्नातून २५ - १५ अंतर्गत नऊ कोटी तेवीस लक्ष रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे .या शिवाय लोहा _ कंधार विधानसभा मतदारसंघासाठी लातूर लोकसभेचे खा.सुधाकरराव श्रंगारे यानी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. लोहा -कंधार विधानसभा मतदार संघातील मौ.कलंबर (बु. ) ता.लोहा येथील सरपंच सौ.विमलबाई मन्नुसिंग ठाकुर यांनी गावच्या विकासाठी व हनुमान मंदिरासमोर सांस्कृतिक सभागृहासाठी निवेदना द्वारे निधीची मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे मागणी करण्यात केली होती.
या मागणीची दखल घेऊन गावाच्या विकासासाठी म्हणून हनुमान मंदिर सांस्कृतिक सभागृहासाठी २५-१५ अंतर्गत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी सात लक्ष रूपयाचा निधी मंजूर झाल्याचे पत्र सरपंच सौ.विमलबाई मन्नुसिंग ठाकुर व ग्रामसेवक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. या निधीमुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. जिथे जिथे निधीची आवश्यकता आसेल त्या ठिकाणी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन सरपंच सौ.विमलबाई मन्नुसिंह ठाकुर व गावकरी यांना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व लातूर जिल्ह्याचे खा. सुधाकरराव श्रृंगारे यांच्या कडून आश्वासन देण्यात आले .