हदगाव| शहरातील जुन्या गावातील मारोती नगर येथील श्री हनुमान मंदिराच्या कलशारोहनाचा कार्यक्रम दिनाक २६ रोजी हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दरम्यान दिनाक २५ रोजी रात्री ह.भ.प. सुरेश महाराज पोफाळीकर यांचे कीर्तन झाले. दिनाक २६ रोजी सकाळी शहरातून कलशाची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण शहरातून ही मिरवणूक फिरवण्यात आली. जय श्री राम, पवन पुत्र हनुमान की जय नांमाच्या जय घोषाणे हदगाव नगरी दुमदुमून गेली होती.शोभा यात्रेत महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता.काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंतराव गंधेवार, दिगांबरराव दमकोंडवार,राजू पांडे, उमाकांत माळोदे,दिपक पोगरे, उमाकांत भोरे, श्रीनिवास दमकोंडवार, बालाजी घळाप्पा, बालाजी शंकुरवार,सचिन सूर्यवंशी,प्रविण गंधेवार,विशाल सोनूने,लखन सबरवाड,संदीप सोनुने, विशाल सोनुने, प्रसाद बाभळे, किरण बोरकर, प्रदीप सोनुने, विकास डोरले, विष्णू माळोदे, आनंद माळोदे,बालाजी महाजन, हर्षद सोनूने, कृष्णा पेनेवाड,तुकाराम वानखेडे, शिवा पोगरे,भाऊराव लकडे, गणेश सोनुने, राहुल व्यवहारे, सचिन पोटेकर, सतिश शिंदे, दत्तराव जगताप,राहुल बिरदाळे,विणकरे मामा आदीनी परिषम घेतले.