प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्यानी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेणे गरजेचे
हिमायतनगर,अनिल नाईक| शहरात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. अल्पसा पाऊस होताच नालीचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने पादचाऱ्यांना घाण पाण्यातून मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. यामुळे पावसाळ्यात शहरात साथीचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि बाब लक्षात घेऊन प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्यानी आढावा घेऊन शहरवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
रिमझिम पावसामुळे शहर परिसर नाल्यातील घाण थेट रस्त्यावर आली असून, सराफ लाईन, चौपाटी परिसर, उमर चौक ते परमेश्वर मंदिर कमान, लाकडोबा चौक, आंबेडकर चौक, बाजार चौक, बजरंग चौक, यासह इतर ठीक ठिकाणच्या चौकात नाल्याचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर येत आहे. या पावसामुळे शहरात दुर्गंधी पसरली असून, नगरपंचायतीने स्वच्छतेचा ठेका १५ लेखाला दिलेला असताना आवश्यकतेप्रमे नाल्याची सफाई नियमित केली जात नसल्याने नालीतील घाण रत्स्यावर येत आहे. त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या घाण पाण्यातून नागरिका रास्ता पार करावा लागतो आहे.
एखादे वाहन रस्त्याने गेल्यास हेच घाण पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने शहर परिसरातील नागरिक दुर्गंधीने टेस्ट झाली आहे. येथील नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या निरीक्षकांचे याकडे दुर्लक्ष होत नियुक्त असलेलं प्रशासक आणि प्रभारी मुख्याधिकारी १० ते १५ दिवस नगरपंचायतीकडे फिरकत नसल्याने शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने शासन याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देत असताना शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते आहे.
स्वच्छतेच्या ठेकेदाराकडून होत असलेला दुर्लक्षितपणा याबाबत जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, आणि आता आयुक्तालयात तक्रार दिली आहे, असे असताना अंदाजपत्रकाप्रमाणे मनुष्यबळ, यंत्रणा, न ठेवता थातुर माथूर काम करण्यावर पल्लवीच्या ठेकेदारांचा भर दिसत आहे. याकडे प्रशासक व मुख्याधिकारी देखील स्वार्थापोटी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ठेकेदारचे मनसुबे वाढले असून, कोणतेही काम ना करता १५ लक्ष रुपये दार महा उचलत आहेत. याकडे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी लक्ष देऊन नियमित स्वच्छतेच्या बाबतीत दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराचे टेंडर रद्द करून नव्याने अन्य कुणाल स्वच्छतेचा तोही कमी दारात द्यावा. कारण शहराच्या स्वच्छतेचे काम ग्रामपंचायत असताना ७० ते ९० हजार रुपये महिन्यात होत होते, आता १५ लक्ष देऊनही त्याप्रमाणे स्वच्छता नाही त्यामुळे नळीची घाण थोडा पाऊस पडल्यावरही रत्स्यावर येते. अनेक नळ्या तुंबलेल्या असून, ठेकेदारचे माणसे तर शहरातील वॉर्ड १७, वॉर्ड ४, वॉर्ड १६, असा अनेक भागात अद्याप फिरकले नसल्याचे त्या भागातील नागरिक सांगतात. याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान यांनी म्हंटले आहे. आत याबाबत थेट उपमुख्यमंत्री अजितदादाकडे तक्रार देणार असल्याचे त्यांनी संगितले आहे.