नांदेड। तक्रारदार यांचे शेत जमिनीची वाटणीपत्राद्वारे फेरफारला नोंद घेऊन सात बारा देण्यासाठी, तलाठी यांनी 25,000/- रु. लाचेची मागणी करून त्यापैकी 15,000/- रु. यापूर्वीच स्विकारले. आणि उर्वरित 10,000/- रु. कोतवाल यांचे मार्फतीने मागणी करून तडजोडीअंती 7,000/- रु. स्विकारले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्यासह कोतवालास रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
तक्रारदार शेतकऱ्यांचे शेत जमिनीची वाटणीपत्राद्वारे फेरफारला नोंद घेऊन सात बारा देण्यासाठी दि.16 जून रोजी श्री संभाजी रघुनाथ घुगे,व्यवसाय - शासकीय नोकरी, तलाठी, सज्जा मार्तंड ता. जि. नांदेड रा. मानिकनगर, नांदेड यांनी 25 हजाराच्या लाचेची मागणी केली. आणि यासाठी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घेतले. त्यानंतर श्री बालाजी ग्यानबाराव सोनटक्के, वय 39 वर्षे, व्यवसाय शासकीय नोकरी, पद कोतवाल, नेमणुक तलाठी सज्जा विष्णुपुरी ता. जि. नांदेड रा. वाहेगाव, ता. जि. नांदेड यांचे मार्फत दि.20/06/2022 उर्वरित 10,000/- लाचेची मागणी केली, तडजोडीअंती 07,000/- रु. देण्याचे ठरले. परंतु पुन्हा लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
एसीबीने सदर लाच मागणी पडताळणी केली असता 7 हजार लाचेची रक्कम स्विकारली असता त्या दोघांना रंगेहात ताब्यात घेतले असुन, या संबंधी गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे. सदर कार्यवाही डॉ राजकुमार शिंदे, पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड, श्री. धरमसिंग चव्हाण अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नांदेड, परिक्षेत्र नांदेड, पर्यवेक्षण अधिकारी (एस. ओ.) श्री राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांचे मार्गदशनखाली सापळा अधिकारी (टी.ओ.) श्री अश्विनीकुमार महाजन, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांनी सापळा कारवाई पथक श्री राहुल पखाले, पोलीस निरीक्षक,
पोह किशन चिंतोरे, पोना सचिन गायकवाड, जगन्नाथ अनंतवार, शिवशंकर भारती चापोना नीलकंठ यमुनवाड, मारोती सोनटक्के, गजानन राऊत आणि सर्व ला.प्र.वि.युनिट नांदेड, तपास अधिकारी, श्री अश्विनीकुमार महाजन , पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांनी केली.
या कार्यवाही नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान केले की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. कार्यालय दुरध्वनी - 02262 253512, राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड, मोबाईल नंबर - 7350197197 @ टोल फ्रि क्रं. 1064 यावर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.