श्री भगवान महावीर जयंतीचे औचित्य, स्थानिक आमदार निधीतून आठ लक्ष रुपयांचा निधी
नांदेड| महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. 1 मधील तरोडा खु. परिसरातील जैन मंदिर ते श्री. हिराप सर यांच्या घरापर्यंत च्या रस्त्याचे लोकार्पण अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक भगवान महावीर जयंती निमित्ताने आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आ. बालाजी कल्याणकर यांनी स्थानिक आमदार निधी मधून आठ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जयवंत केंद्रे तसेच परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर हे आपल्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे करत आहेत. स्थानिक आमदार निधी खर्च करण्यात जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. आ. बालाजी कल्याणकर यांचा विकास कामाचा धडाका शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जैन मंदिर परिसरातील नागरिक, गुरु तसेच भावीक – भक्त अनेक दिवसापासून हा रस्ता करुण देण्याची मागणी करत होते. महिलांनी देखील आ. बालाजी कल्याणकर यांची भेट घेऊन रस्ता करून देण्याची मागणी केली होती. तरोडा खु. परिसरातील जैन मंदिर मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातीलच नव्हे तर बाहेरून देखील येथे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे हा रस्ता करणे महत्त्वाचे होते.
आ. बालाजी कल्याणकर यांनी लक्ष घालून आपल्या स्थानिक आमदार निधीमधून आठ लक्ष रुपये उपलब्ध करून देत, जैन मंदिर ते हिराप सर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट चा रस्ता करून दिला आहे. अहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक भगवान महावीर जयंती निमित्ताने या रस्त्याचे लोकार्पण आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिक तसेच भावीक – भक्तांनी आ. बालाजी कल्याणकर यांचे जंगी स्वागंत करून, आभार मानले आहेत. आ. बालाजी कल्याणकर यांनी देखील जयंतीच्या निमित्ताने भगवान महावीरांचे दर्शन घेऊन, यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या.