अवैध धंदे बंद नाही केल्यास आम्ही सर्व लोकशाही मार्गाने आंदोलन करणार
हिमायतनगर, अनिल नाईक| शहरासह तालुक्यात राजकीय वरदहस्ताने गुटका, मटका, जुगार अड्डे, दारूची अवैध विक्री आणि सावकारी धंद्यासह इतर यासह अवैध धंदे बंद राजरोसपणे चालविले जात आहेत. त्यामुळे गरजू व हातावर पोट असलेले मजुरदार शेतकरी या व्यसनाच्या आहारी जात असून, परिणामी यांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. त्यामुळे वाढत असलेल्या या अवैद्य धंद्यावर कार्यवाही करून देशोधडीला लागणारे संसार वाचवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज गुडेटवार यांनी पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हिमायतनगर शहरासह तालुक्यात गुटखा, मटका, जुगार अड्डे, दारू यासह इतर अवैध धंदे शहरातील गल्ली बोळात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा अनेक वेळा नागरिक आरोप तक्रारू करतात. तक्रारी नंतर काही दिवस अवैध धंदे बंद होऊन पुन्हा जैसे थे सुरू असतात. याविरुद्ध येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज गुडेटवार यांनी आवाज उठविला असून पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांना निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, गेल्या 1 वर्षापासुन हिमायतनगर शहरात दारु, गुटखा, मटका, जुगाराचे अवैध धंदे चालु असुन, त्यांना कायद्याचे भय नसल्याचे समजत आहे. व ते बिनघोर आपले अवैध धंदे चालवत आहेत. त्यांचेवर पोलीस प्रशासनाची नजर नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आम्ही सर्व हिमायतनगर शहरातील गुटखा, मटका, दारु, जुगार चे अवैध धंदे बंद करण्यासाठी आपल्याकडे तक्रार करीत आहोत. जर लवकरात लवकर अवैध धंदे बंद नाही केल्यास आम्ही सर्व लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत, असा इशारा दिला आहे. निवेदनावर मनोज उर्फ बंटी गुडेटवार यांची स्वाक्षरी असुन भाजपाचे राम सुर्यवंशी, खंडु चव्हाण यांची अर्जावर नावे आहेत.