या विद्यालयाची कु. प्रिया तोडे हिने तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। महाराष्ट्र शासनाने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन शै. वर्ष 2022--23 या वर्षामध्ये केले आहे. या परिपत्रकानुसार नायगांव दि. 06/12/2022 रोजी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले होते.
त्यामध्ये मिलेनियम पब्लिक स्कुलच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला होता. डबल बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिक्षा भद्रे आणि श्रद्धा घोडके या विद्यार्थीनी दुसरा क्रमांक पटकवला तर कु. प्रिया विलासराव तोडे या विद्यार्थीनीने बॅडमिंटन सिंगल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवून जिल्हास्तरीय साठी पात्र ठरली.
'सदरील विद्यार्थीनीना शाळेचे क्रिडा शिक्षक श्री. वाकरडे सर यांनी मार्गदर्शन केले. श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. शिवराजजी पाटील होटाळकर यांनी विदयार्थीनींना पुढील वाटचालीस अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, तर सर्व विद्यालयाचे प्राचार्य व सर्व स्टाफ यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.