नवीन नांदेड। श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित सिडको नवीन नांदेड येथील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रिया काशिनाथ ससाने हिची बी.एस.एफ.(गुजरात, केंद्र शासन) येथे शासकीय नोकरी साठी निवड झाली आहे.
ही निवड झाल्याबद्दल प्राचार्य व्ही. एन. देवसरकरयांच्या हस्ते कु.प्रिया काशिनाथ ससाने हिचा सत्कार करण्यात आला. या वेळी पर्यवेक्षक चंदेल ,रमेश सजन,सतनुरे प्रा. संजय देशमुख,पाताळे , प्रा फाजगे ,प्रा.कोठुळे ,प्रा.शिंदे प्रा.नितीन, सतीश, यांनी अभिनंदन केले आहे. इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा.डॉ.रमेश नांदेडकर हे सामाजिक बांधिलकी जोपासत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीना दररोज सकाळी ५:०० वा पासून मोफत पोलीस भरती प्रशिक्षण देतात.
डॉ.नांदेडकर हे जवळपास पंधरा वर्षापासून मुलींना मोफत पोलिस भरती प्रशिक्षण देतात, त्यांच्याच मार्गदर्शनामुळे कु. प्रिया ससाणे हि स्वतःच्या पायावर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. आजतागायत क्रिडा शिक्षक प्रा. डॉ.रमेश नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळ पास ७९ मुली पोलीस भरती व इतर वेगवेगळ्या शासकीय व निमशासकीय कार्यालयात नौकरीला लागलेले आहेत.