मध्ययुगीन कालखंडा पासुन चालु असलेल्या श्री खंडोबा देवाची पालखी सोहळा भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गर्जनेत भक्तांनी दर्शन घेतले
बिलोली, शिवराज भायनुरे। बिलोली तालुक्यातील मौजे माचनुर येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त दरवर्षी दोन दिवसीय यात्रा महोत्सव भरला जातो. तीच परंपरा माचनुर येथील ग्रामस्थांनी टिकवीत काल दिं ०७ डिसेंबर रोजी सकाळी अंखड हरीनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प. माधव गुरूजी वडगावे पांगरीकर यांच्या काल्याचे किर्तनाने झाली व लगेच महाप्रसाद घेऊन रात्री १० च्या सुमारास पालखी मिरवणूक अत्यंत भक्तीमय वातावरणामध्ये परिसरातील भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली.
माचनुर गाव हे महाराष्ट्र व तेलंगणाच्या सिमेवर असल्याने महाराष्ट्र व तेलंगाना या दोन्ही राज्यातील भक्तांची श्रद्धास्थान श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त दोन दिवसीय यात्रा महोत्सव होत असतो यानिमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम व अनेक कार्यक्रमाचे आयोजन येथिल ग्रामस्थांनी करत असतात त्यात हरिनाम सप्ताह, महाप्रसाद,भव्य पशुप्रदर्शन,रक्तदान शिबीर, श्री खंडोबा देवाची पालखी सोहळा, व जंगी कुस्ती अत्यंत उत्साहासत होत असतात.
जुन्या काळापासून परंपरेने चालु असलेली ही यात्रा महोत्सव व अनेकांचे श्री खंडोबा हे श्रद्धास्थान असल्याने या यात्रेत भंग पडुनये यासाठी गावातील अनेक समाजबांधवांची प्रामाणिक प्रयत्न असतो व प्रतिसाद ही मिळतो कारण यानिमित्ताने महाराष्ट्र व तेलंगानातुन अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात आणि अनेकांच्या मनात भक्ती आणि भावच रुजलेली असते व ते उत्साह पुर्ण वातावरण असते या खंडोबा देवाची पालखी मिरवणूक श्री खंडोबा मंदिरापासून ते हनुमान मंदिरा पर्यंत अनेक भक्तांच्या हातात झेंडे, भंडारा व प्रसाद घेऊन येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट या गर्जनेतुन पालखीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली आहे.
दिं ०८ डिसेंबर रोजी दुपारी अनेक पैलवानांच्या कुस्तीचे सामने रंगले यात पहीली कुस्ती १० रुपयांपासून सुरुवात झाली. तर द्वितीय क्रमांक कुस्ती ग्रामपंचायत मार्फत ५००० रुपयांची बक्षीस देण्यात आले तर शेवटची कुस्ती ७००० रुपयांची शेवटची कुस्ती पै. साईनाथ बितन्याळ विरुध पै. गजानन जाहुर यांची रंगली. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष कुस्ती समिती, पोलीस पाटीलांसह अनेक पैलवान व परिसरातील असंख्य जनसमुदाय उपस्थित होते तर कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांची चोख बंदोबस्त तैनात करण्यात आले होते.