किनवट। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. मात्र आजही राज्यातील आदिवासी गावांना आपल्या मुलभूत गरजांसाठी-सोयीसुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय. असेच एक उदाहरणं, किनवट तालुक्यातील जालधारा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे पूर्णपणे डोगराच्या कुशीत वसलेले मांजरी माथा हे गाव..
गावाला ना -रस्ता, ना-वैद्यकीय सुविधा ना -कुठली सरकारी योजना, खरंच आज हि वाटते ते फक्त त्यांचं अमूल्य मतदान करायलाचा त्यांनी जन्म घेतला कि काय..? रस्त्याअभावी गावातील 20 ते 25 लोकांनी आपला जीव गमावला तरीही त्यांच्याकडे कोणाचेच का लक्ष नाही..
विशेषतः ही ग्रामपंचायत PESA अंतर्गत असून सुद्धा विकासा पासून दुर्लक्षित वर्षोनीवर्ष नेत्यांच्या आस्वासनाच्या आशेने एक-एक दिवस काढत "विकास कधी येईल? म्हणून वाट बघून बघून मातारे होतं आहे.मात्र येथील, स्थानिक लोकप्रतिनिधि अजुनही निद्रावस्थेतच आहेत.
हे गाव जंगल माळरानात असून या गावाच्या दळणवळणासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे स्वातंत्र्यापासून दळण वळण करण्यासाठी येथील आदिवासी ग्रामस्थांना फार मोठा त्रास होत आहे. पावसाळा सुरु झाला कि मग तर तारेवरची कसरत करत जीवघेना प्रवास करावा लागतो करण जलधारा लगत असलेले मोठे तलाव या तलावाला येणाऱ्या पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्यामुळे पहिल्या एक दोन पाण्यात तलाव 100% भरतो ते भरल्याने ओढ्याला असतत पूर असतो या पुरातून येथील नागरिक जीव-घेना प्रवास करत आहे...
देशाच्या स्वातंत्र्यानंतरही आम्ही केवळ आदिवासी असल्याने आम्हाला पक्का रस्ता मिळत नसेल तर मा.राज्यपालच काय मा.राष्ट्रपती किनवटला येऊन गेले तरी त्याचे आम्हाला नवल नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आदिवासी बहुल किनवट तालुक्यातील जलधारा ग्रामपंचायत अंतर्गत मांजरी माथा येथील ग्रामस्थांनी दिली.