मायक्रो फायनान्सच्या चिंतेत आत्महत्या केल्याची नागरिकांची तक्रार
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे खडकी बा. येथील एका ४५ वर्षीय शेतमजुराने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना दि.०८ रोजी सकाळी उघडकीस आली असून, विलास नामदेव हनवते असे शेतमजुरांचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बा. येथील शेतमजुर विलास नामदेव हनवते वय 45 वर्षे या शेतमजुराने मागील काळात खाजगी मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची मागणी होत असल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. दिनांक सात रोजी रात्री नऊ वाजता सुमारास शेतमजुर विलास नामदेव हनवते घरून जेवण करून गेला तो आला नाही.
त्त्यामुळे नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर गावालगत असलेल्या एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेला अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून, मयताचे प्रेत शवं विच्छेदनासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. याबाबत नातेवाईकांनी सांगितले की, मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्ज घेतले होते, त्याची परतफेड झाली नसल्याच्या चिंतेने त्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी तीन वाजता बौद्ध समशानभूमी खडकी येथे अंत्यविधी केला जाणार आहे. या घटनेचे व्रत लिहीपर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.