नांदेड| पेन्शनर्स संघटनेच्या वतीन जिल्हा परिषद नांदेड येथे पेन्शन अदालत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष इजि द. मा.रेड्डी, सचिव ऍड चंद्रकांत जटाळ, उपाध्यक्ष मीराखान यांच्या पुढाकाराने ही पेन्शनर्स अदालत पार पडली.
नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृह पेन्शन अदालत संपन्न झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, यांची प्रमुख उपस्थिती होती. अति. मु.का.अ. संदीप माळवदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (सामान्य) डॉ. संधीर ठोबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, शिवप्रसाद चन्ना, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, शेखर कुलकर्णी ,प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी, श्रीमती सविता बिरगे, कक्ष अधिकारी, शेख मुकरम व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पेन्शन अदालत मध्ये नांदेड जिल्हा सेवा निवृत्त कर्मचारी, अधिकारी व जेष्ठ नागरीक असोशिएशन, नांदेडचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद अंतर्गत सेवा निवृत्त झालेल्या कर्मचारी शिक्षकांची अनेक प्रलंबीत प्रकरणा बाबत सविस्तर पणे चर्चा झाली व प्रत्येक मुद्यावर सकारात्मक न्यर्चा होऊन संघटनेने चर्चेला घेतलेल्या सर्व प्रश्न निकाली काढण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधीत अधिकारी यांनी आश्वासन दिले. अशी माहिती पेन्शनर्स संघटनेचे सचिव चंद्रकांत जटाळ यांनी दिली. जि.प. नांदेडच्या वतीने यांनी पेन्शनर्स संघटनेच्या पदाधिकान्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पेन्शनर्स संघटनेचे, इंजि.द.मा. रेड्डी उपाध्यक्ष, महमद मिरा खान सचिव चंद्रकांत जटाळ तसेच सुरेश चौधरी, जनार्धन मुंडे, स. पुरणसिंघ, सादिक टेंभुर्णीकर, लक्ष्मण लंके, सुभाष कुरुड़े, रामराव लोणकर, शेख हुसैन चौधरी या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.