उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी सभापती तथा शिराढोण येथील भूमिपुत्र बालाजी माधवराव पांडागळे यांची नियुक्ती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर यांनी केली आहे.पुन्हा बालाजी पांडागळे यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल उस्माननगर येथे फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.
कंधार तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सर्कल मधील बालाजी पांडागळे याच्यां जनसंपर्क पाहता व तालुक्यातील, उस्माननगर, शिराढोण ,दहीकळंबा , आलेगाव,भुत्याची वाडी , व पंचायत समितीच्या आठ गणात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी व विशेष काँग्रेस पक्षाच्या विविध विकासात्मक कामे, आंदोलनात सहभाग नोदंवुन केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कंधार तालुका अध्यक्ष पदी पुन्हा नियुक्ती केली आहे. सदरील नियुक्ती जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर यांनी केली असून नियुक्ती पत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आ. जितेश अंतापुरकर, माजी आमदार ईश्वरराव भोसिकर माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर,
अँड. सुरेंद्र घोडजकर, कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आनंद गुंडले, जिल्हा युवक काँग्रेसचे पप्पु पाटील कोढेकर, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष डॉ. मिनालताई खतगावकर, नांदेड तालुका महिला अध्यक्षा सौ. संगिता डक, कविता कळसकर, शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अनुजा तेहरा, यांच्या सह पदाधिकारी यांच्या ऊपसिथीत करण्यात आली. या नियुक्ती बद्दल उस्माननगर येथील अमिनशा फकीर ,अशोक काळम पाटील, व्यंकटराव पाटील घोरबांड, शेख बाशीदभाई सदर,मा.उपसरपंच राहुल सोनसळे, कमलाकर शिंदे,प्रा.विजय भिसे ,अंगुलिकुमार सोनसळे,दत्ता पाटील घोरबांड, गोविंद पोटजळे, गंगाधर भिसे,नरेश शिंदे,संभा शिंदे, बालाजी द.घोरबांड, तुकाराम भिसे, व्यंकटराव सोनटक्के टेलर,मुखीद मौलाना,जावेद मौलाना, साखरे , यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले.व उस्माननगर येथे फटाके वाजवून निवडीचे स्वागत केले.