सचखंड एक्स्प्रेस आणि बेंगलोर एक्स्प्रेस रेल्वेच्या मार्गवळविला -NNL


नांदेड।
मध्य रेल्वे मधील जळगाव रेल्वे स्थानकावर यार्ड रेमोडेलींग चे कार्य पूर्ण करण्याकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे दिनांक 4 आणि 5 डिसेंबर-2022 रोजी अमृतसरहून सुटलेली गाडी क्रमांक 12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस खांडवा-भुसावळ कॅार्ड-अकोला-पूर्णा मार्गे वळवली आहे.

 दक्षिण पश्चिम रेल्वे मधील बंगलोर विभागात येलहांका रेल्वे स्थानकाजवळ भुयारी रेल्वे पुलाचे कार्य करण्याकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे , यामुळे दिनांक 5 डिसेंबर, 2022 रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 16594 नांदेड-बेंगलोर एक्स्प्रेस येशवंतपूर – माल्लेस्वरम  मार्गे वळविण्यात आली आहे, यामुळे हि गाडी बेंगलोर केंट या रेल्वे स्थानकावरून धावणार नाही. प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी. असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी