नांदेड| श्री दासगणु संत भक्त मंडळ नांदेड व एन.इ.एस. सायन्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् भगवद्गीता अध्याय आठवा पठन/पाठांंतर स्पर्धेत प्रतिभा निकेतन हायस्कूल श्रीनगरच्या विद्यार्थ्यांनी श्रीनिवास सांबशास्त्री मदनुकर स्मृतिप्रित्यर्थ दिले जाणारे पारितोषिक पटकावले आहे.
सोमवार दि. 12 डिसेंबर रोजी कुसुम सभागृहात झालेल्या या स्पर्धेत शहरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता. श्री भग्वद्गीता जयंतीचे औचित्य साधून प्रतिवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे सातवे वर्षे असून स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रतिभा निकेतन हायस्कूल श्रीनगरचा मार्तंड रमेश पांडे, कु. आर्या मंगेश पुरकर, कु. सुखदा संजयराव पांडे,कु. अंजली केशव महाजन, मयुरी मंगेश चलवा (सर्व इयत्ता 9 वी अ) कु. नम्रता गजानन येमुलकर आणि कु.सृष्टी दुर्गादास टाक (इयत्ता 8 वी अ) या विद्यार्थ्यांनी श्रीमद् भगद्गीता अध्याय आठवा पठन व पाठांंतर सादरीकरण करून पारितोषिकाचे मानकरी ठरले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षक व विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. विद्यार्र्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अ.सू कुरुंमभट्टे सौ. वंदना कानडखेडकर, अरुण मुदगलकर, अंकिता कामतीकर या गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षकवृंद आणि पालकांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.