20 अनधिकृत फेरीवाल्यांवर कार्यवाही, नांदेड रेल्वे विभागा तर्फे धडक मोहीम, 15 हजार रुपये दंड वसूल -NNL


नांदेड|
दक्षिण मध्य रल्वे, नांदेड विभाग अनिधिकृत फेरी वाल्यांना आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनिधिकृत फेरी वाल्यांविरोधात कार्यवाही करत असते. या अंतर्गतच आज नांदेड विभागाने मोठ्या प्रमाणावर अनिधिकृत फेरी वाल्यांवर कार्यवाही केली. 09 तिकीट तपासणीसांनी या मोहिमेत भाग घेतला. 

हि मोहीम दुपारी 02 वाजता सुरु करण्यात आली. यात नांदेड ते मुदखेड दरम्यान धावणाऱ्या  रेल्वे गाड्या मध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात नांदेड-आदिलाबाद आणि आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस तसेच आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या.  

रेल्वे मध्ये अचानक धाड पडल्याने अनिधिकृत फेरी वाल्यांचे धाबे दणाणले. यात तब्बल 20 अनिधिकृत फेरी वाल्यांना पकडण्यात आले. त्यांच्या कडून 15,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. जे अनअधिकृत फेरीवाले वाटर बोटल, समोसे आणि इतर पदार्थ  विकत होते ते जप्त करण्यात आले. या अनधिकृत फेरी वाल्यांचा बायो डाटा बनवण्यात आल्या. पुन्हा हे फेरीवाले रेल्वे गाड्यांमध्ये अश्या प्रकारे अनअधिकृत पदार्थ विकणार नाहीत याची त्यांना ताकीत देण्यात आली.

हि मोहीम अनअधिकृत विक्रेते आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मध्ये नैतिक भीती निर्माण करण्या करिता आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्या करिता करण्यात आली. या तपासणी मोहिमे मुळे  कोणतीही रेल्वे गाडी उशिरा धावणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली. रेल्वे विभागातर्फे श्री नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड विभाग यांनी कळविले आहे कि, अशा प्रकारची मोहीम नांदेड विभागातील इतर सेक्शन मध्ये हि नियमित पणे राबविण्यात येईल आणि अनिधिकृत फेरी वाल्यांना आळा घालण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येईल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी