अपघात होताचं पलायन करणाऱ्या चालकास केली अटक
नांदेड। जिल्ह्यातील किनवट शहरांतून भोकरकडे येत असलेल्या एका मालवाहू ट्रकने रस्त्याने चालत असलेल्या एका महिलेस चिरडल्याची घटना भोकर शहरातील किनवट रोडवर घडली आहे. शांताबाई रामराव मलदोडे, रा,वैजापूर पार्टी, ता. मुदखेड असे मृतक महिलेचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शांताबाई रामराव मलदोडे, रा, वैजापूर पार्टी, ता. मुदखेड तालुक्यातील रहिवासी महिला रस्त्याने चालत होती. भरधाव वेगाने वाहन चालविणारा ट्रक क्रमांक एम एच 26 बी ९०९८ ने महिलेला चिरडले, घटना होताच ट्रक चालक हा वाहनांसह पलायन करत असताना त्यास भोकर पासून 5 किलोमीटर अंतरावर नागरिकांनी व पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडले आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, सदरील महिलेचा जागीच चंदामेंदा झाला असून, अपघात ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी ततातडीने घटनास्थळी धाव घेऊन पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला पकडून अटक केली आहे. वृत्त लिहिपर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.