गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान मोहणपूर येथे श्री दत्तात्रय उत्सवाचे आयोजन -NNL

ता. 7 डिसेम्बर पासून यात्रेस प्रारंभ : श्री महंत 1008 रामभरती महाराज, कुस्त्यांची दंगल व कृषी प्रदर्शन


नांदेड।
नांदेड तालुक्यातील पवित्रपावन धार्मिकस्थळ गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान मोहणपूर मौ. वाहेगाव यांच्या सन्निध्यात तीन दिवसीय "श्री दत्तात्रय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्तात्रय जयंती निमित्त दरवर्षी उत्सवाचे आयोजन केले जाते यावर्षी सुद्धा दि. 30 नोव्हेंबर पासून श्री भागवत कथा कार्यक्रमाद्वारे विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असल्याची माहिती महंत 1008 रामभरती गुरु मारोती भारती यांनी येथे दिली. 

महंत रामभरती महाराज पुढे सांगितले की, संत, महात्मा, धार्मिक मंडळी, सर्व भक्तांच्या व गावातील मंडळीच्या सहकार्याने श्री दत्तात्रय उत्सवानिमित्त मोहणपूर मौजे वाहेगाव ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. ता. 6 डिसेम्बर रोजी श्री भागवत कथेची समापन करण्यात येईल. भागवत सप्ताहात प्रतिदिन काकडा, बालक्रीडा ग्रंथाचे परायण, कथा, महाप्रसाद व महापुजा सारखे कार्यक्रम पार पाडण्यात आले आहेत. सध्याही कार्यक्रम सुरु आहेत. 

दि. 7 डिसेम्बर, बुधवार रोजी दत्तात्रय उत्सवाचे उद्धघाटन श्री महंत 1008 रामभरती महाराज यांच्या हस्ते करण्यात येईल. कार्यक्रमास श्री महंत जिवनदास (संस्थान चुडावा, भोपाळ, जालना), संत शामगिर महाराज (हरबळ), मा. आ. श्री राम पाटिल रातोळीकर (विधान परिषद), मा. आ. श्री मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण), मा. आ. श्री बालाजीराव कल्याणकर (नांदेड उत्तर), मा. श्री ओमप्रकाश पोकर्णा (माजी आमदार), मा. श्री विकास माने (उपविभागीय पोलीस अधिकारी), श्री किरण अंबेकर (तहसीलदार नांदेड), मा. श्री दिलीप कंदकुर्ते (प्रदेश अध्यक्ष व्या. आ. भाजपा), मा. श्री नीलकंठ भोसीकर (जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड), मा. श्री बालाजी पुणेगावकर (भाजपा जिल्हाध्यक्ष), मा. श्री राजेश गंगाधरराव कुंटूरकर (कुंटूर शुगर लि.), मा. श्री मारोतराव व्यंकटराव कवळे गुरूजी (चेयरमैन व्ही.पी. के. एग्रो फूड सिंधी), मा. सौ. संगीताबाई विट्ठलराव डक (नगरसेविका), मा. श्री आनंद भारती (संचालक सं.गा.नि.यो.), मा. श्री गंगाधर पाटिल सिंगनगावकर (तानुर मंडल सभापती), मा. श्री चंद्रकांत पाटिल (माजी नगराध्यक्ष), पत्रकार श्री रविंद्रसिंघ मोदी, श्री नवनाथ येवले, श्री शिवाजी मोरे सोनखेड, श्री आनंदा बोकारे, श्री माणिकराव मोरे (दैनिक देशोन्नती) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसाद आणि महापूजा व भजन कार्यक्रम सादर होईल. 

दि. 8, गुरुवारी सकाळी 7 वा. श्री ची पालखी मिरवणूक काढण्यात येईल. तसेच महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. दि. 9 शुक्रवार रोजी जंगी कुस्त्यांची दंगल घेण्यात येईल. कुस्ती दंगल कार्यक्रमाचे उदघाटन विधानपरिषद आमदार मा. श्री राम पाटिल रातोळीकर यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिणचे आमदार मा.श्री मोहनराव हंबर्डे, नांदेड उत्तरचे आमदार मा.श्री बालाजीराव कल्याणकर, मधुमेह तज्ञ मा. डॉ महेश तळेगावकर, शिवसेना जिल्हा प्रमुख नांदेड मा. श्री भुजंग पाटिल), मा. श्री आनंद पाटिल नांदेड, सभापती प. स. लोहा मा. श्री सतीश पा. उमरेकर यांची उपस्थिती राहणार आहे. 

तसेच कुस्ती दंगल कार्यक्रमाचे आयोजक मा. श्री कैलास पाटिल, मा. श्री मारोती घोरपडे (माजी अध्यक्ष टंटामुक्ती वाहेगाव), मा. श्री तुकाराम पवार (उपतालुका प्रमुख शिवसेना), मा. श्री शंकरराव सोनटक्के यांचे सहकार्य लाभणार आहे. बक्षीश वितरण माजी नगराध्यक्ष मा. श्री चंद्रकांत पाटिल यांच्या हस्ते होईल. सायंकाळी शाहिर रमेश गिरी व संच यांचा कार्यक्रम सादर होईल. तीन दिवसीय धार्मिक यात्रेदरम्यान (ता. 7 ते 9 डिसेम्बर) जिल्हा परिषद व तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषि प्रदर्शन लावण्यात येईल. वरील कार्यक्रमांना भक्त मंडळींनी उपस्थित राहून प्रसाद ग्रहण करावे असे आवाहन महंत 1008 श्री रामभरती गुरु मारोती भारती यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी