नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दरमहा पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १९ डिसेंबर रोजी सोमवारी बाबासाहेब पाहिलेला माणूस हा कार्यक्रम होणार असून, मार्गशिर्ष पौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच परित्राणपाठ, धम्मध्वजारोहण, त्रिरत्नवंदना, बोधीपुजा, सूत्
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात मार्गशिर्ष पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'बाबासाहेब पाहिलेला माणूस' या विषयावर आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. मार्गशिर्ष पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांना बिम्बिसार राजाने वेळूवन दान दिले. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने १९ व्या वर्षी धम्मदीक्षा घेवून भिक्खुनी संघाची स्थापना केली.
तसेच देवद्त्ताने सोडलेल्या माजलेल्या हत्तीवर मैत्रीपूर्ण भावनेने तथागताने विजय मिळविला. अशा काही महत्वपूर्ण घटना या पौर्णिमेला घडलेल्या आहेत. या निमित्ताने १९ डिसेंबर रोजी सकाळपासूनच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांसाठी भिक्खू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.