रस्त्यात अडथळा करणाऱ्या शेतकऱ्यास समाज देऊन अडथळा दूर करा; अन्यथा मरण उपोषण
हिमायतनगर| खडकी ते सरसम या पांदण रस्त्याला ग्रामपंचायत कडून पूर्वसंमती मिळाली, मात्र एका हेकेखोर शेतकऱ्यामुळे या रस्त्याचे काम सुरु होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. या शेतकऱ्याला समाज देऊन पांदण रस्त्याचे काम सुरु करा अन्यथा शेतकरी महिलांना घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बा. येथील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खडकी ते सरसम या पांदण रस्त्याला ग्रामपंचायत कडून पूर्वसंमती मिळाली आहे. त्यामुळे दि.१५ डिसेंबर रोजी हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार होते. मात्र या रस्त्यावर असलेल्या एका शेतकऱ्याने रास्ता होऊ देणार नाही असा पवित्रा घेऊन अडवल्यामुळे संबंधित रस्त्याचे भूमिपूजन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. परिणामी या रस्त्यावरील असलेले इतर शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी थेट १६ डिसेंबर रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसील प्रशासनाला पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात करा. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भातील निवेदन खडकी येथील पुरुषांनी महिलांच्या उपस्थितीमध्ये हिमायतनगर येथील नायब तहसीलदार विकास राठोड यांना दिले आहे. रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरु न झाल्यास महिलासह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण बसण्याचे निवेदनात नमूद केले आहे.
सदरील रस्ता पूर्ण झाल्यास येथील शेतकऱ्यासह सामान्य नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. कारण हा रास्ता कमी अंतरावर असून, सरसम येथे शासकीय कामासाठी रोज येथील गवारी शेतकऱ्यांना ये-जा करावी लागत असते. सरसम येथे स्टेट बँक असल्यामुळे खडकी हे गाव भारतीय स्टेट बँक सरसमशी सलग्न असल्यामुळे रोज नागरिकांना या रस्त्याने ये जा करावी लागत आहे. सदरील रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकाचा वेळ व पैसाही बचत होईल. त्याचबरोबर सरसम येथील नागरिकांना सुद्धा खडकी येथील रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी सोयीच होईल.
गेल्या ५० वर्षांपासून या रस्त्याची मागणी शेतकरी वर्गातून होते आहे. असे आज निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांनि पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. खडकी बा.येथून नांदेड व आदिलाबादकडे रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांना देखील हा रस्ता सोयीचा होणार असल्यामुळे हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे. सदरील निवेदनावर साहेबराव भाऊराव जाधव, शामराव जाधव, आकाश जाधव, अंकुश चव्हाण, कविताबाई अनिल पवार, अनिताबाई गंगाधर कंदनवार, मला बाई विलास जाधव, शोभाबाई दिलीप पवार इत्यादीसह रस्त्याच्या मागणीसाठी दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून निवेदनावर सह्या केल्या आहेत.