माहूर, राज ठाकूर। पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेले पोलीस नाईक यांची सेवा जेष्ठतानुसार नुकतीच पोलीस हवालदार पदी पदोन्नती झाल्या बद्दल त्यांचा माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव रीठ्ठे यांनी फित लाऊन सत्कार केला
माहूर पोलीस स्टेशन येथे गेल्या चार वर्षा पासून कार्यरत असलेले पोलीस नाईक अशिष सुभाष डगवाल यांनी चोख सेवा बजावली आहे, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नूकतीच सेवा जेष्ठतानुसार या पोलीस नाईक या पदावरुन पोलीस हवालदार पदि पदोन्नती दिली आहे.
माहूर पोलीस ठाण्यात गुरुवार दि,८-१२ रोजी ऐका विशेष कार्यक्रमात यांचा सत्कार करूंन पोलीस हवालदार यांची फित लावली यावेळि सपोनी अण्णासाहेब पवार, संजय पवार ,श्रीधर जगताप, रामचंद्र दराडे, बिट जमादार विजय आडे, आंनद राठोड गजानन ईगळे,प्रकाश देशमुख, चंन्द्र प्रकाश नागरगोजे ,अशोक जाधव आदिनी अभिनंदन केले