उस्माननगर, माणिक भिसे। येथील मा.सरपंच प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते आमिनशा फकीर यांच्या पुढाकारातून नादेड ते शिराढोण बीदर राष्ट्रीय महामार्गावरील मदीनानगर येथे मौलाअली दर्गा कमाणीचा शुभारंभ माजी पं.स.सदस्य तथा माजी पं स. सभापती प्रतिनिधी व्यंकटराव पाटील घोरबांड व उपसरपंच सदरबाशीद भाई शेख यांच्यासह अन्य प्रतिनिधींच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
उस्माननगर येथे मोहरमच्या कालावधीत सर्व हिंदू मुस्लीम बांधव एकत्र येऊन उत्सव साजरा करतात.मोहरमच्या कालावधीत मौलाआली ही सवारीस अन्यन साधारण महत्व आहे. रात्रीला प्रमुख रस्त्याने मार्गक्रमण करून माळावर जाते.याच रस्त्यावर भव्य कमाणीचे नियोजन भक्त मंडळीतून सामाजिक कार्यकर्ते आमिनशा फकीर हे पुढे येवून उस्माननगर ते शिराढोण महामार्गावरील मदीनानगर येथे मौलाअली दर्गा कमाणीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मा.पं.स.सदस्य तथा माजी सभापती प्रतिनिधी व्यंकटराव पाटील घोरबांड, उपसरपंच सदर बाशीद शेख,रामजी लाठकर- सोनसळे , मा.उपसरपंच तथा मुख्याध्यापक राहुल सोनसळे, अशोक पाटील काळम ,अंगुलिकुमार सोनसळे ( ग्रा.पं.सदस्य ) अमिनशा फकीर ,फैजोद्दीन शेख जावेद मौलाना,मुखीद मौलाना, गोविंद पाटील घोरबांड, संभाजी काळम पाटील, बाबा गड्डेवाले,करीम पठाण,, तुकाराम भिसे, अमजद पठाण पत्रकार,हबीब शेख,पत्रकार लक्ष्मण कांबळे यांच्या सह अनेक ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.